पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर’ ! पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पोस्ट

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत पार्थ पवार यांचे वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही , अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले होते. त्यानंतर आता पार्थ पवार यांना आजोळातून समर्थन मिळाले आहे. पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात, अशी पोस्ट नुकतेच भाजपवासी झालेले पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.

You are a born fighter and I’ve seen that since I was a child. I’m proud of you. We are from Osmanabad, we know how to fight.

Posted by Malhar Patil on Wednesday, August 12, 2020

पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहिण आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील मेव्हणे आहेत. मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारले होते.

त्यावर भाष्य करणार नाही, असे पार्थ पवार यांनी म्हटले होते. तर अजित पवार यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याचवेळी आजोळातून मात्र पार्थ पवार यांना समर्थन मिळाले आहे. मल्हार पाटील यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचे कसे हे आपल्याला माहित आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like