भीमा कोरेगाव : NIA च्या तपासाला तुम्ही घाबरताय ? चंद्रकांत पाटलांचा ‘महाविकास’ ला टोला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी एनआयएकडे देण्यात आली आहे. याला राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार विरोध करत आहे. केंद्राच्या दबाबाला बळी न पडता घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे भूमिका घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांनी तुम्ही चौकशीला घाबरत आहात का ? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे.

सोलापूरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपचा हात होता की, काँग्रेसचा हात होता हे चौकशीतून समोर येईल. एनआयएच्या चौकशीला तुम्ही घाबरताय कशाला. ते चौकशी करुन शोधून काढतील की कोणाचा हात आहे.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 1 तारखेला भीमा कोरेगाव दंगल झाली, 2 तारखेला राज्यातील महान नेत्याने शोध लावला की यात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंचा हात आहे. फक्त भीमा कोरेगाव प्रकरणातच नाही तर मगील 5 वर्षात आम्ही ज्या ज्या प्रकरणात आम्ही दोषी असेल असे वाटत असेल तर चौकशी करा.

उलट भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएची चौकशी होऊ नये असे तुम्हालाच वाटते. तुम्हीच घाबरताय. असा टोमणा त्यांनी महाविकासआघाडीच्या सरकारला लगावला. यात जो शोध लागला, त्यातून शहरी नक्षलवाद दिसला. त्यात अजून काही नावे सुटली आहेत. ती ही पुढे येतील असे ही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.