तुम्ही कसले ‘विरोधी’ पक्ष नेता, तुम्ही तर ‘विनोदी’ पक्ष नेता !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये लावरे तो व्हिडिओ असे म्हणत सभा गाजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्याला प्रबळ विरोधी पक्ष पाहिजे. अशी मागणी करत राज्यात प्रबळ विरोधी पक्षासाठी मनसेला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करत आहेत. त्यांच्या या नव्या मागणीचा समाचार भाजपने घेतला आहे. भाजपने एक व्यंगचित्र ट्विट करून राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


व्यंगचित्रामध्ये 2014 च्या निवडणुकीत एक हाती सत्ता द्या अशी मागणी करणारे चित्र रेखाटण्यात आले आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये 2019 च्या निवडणुकीत माझ्या पक्षाला किमान विरोधी पक्ष तरी बनवा अशी विनवणी करताना राज ठाकरे यांना दाखवण्यात आले आहे. तर मतदारांनी त्यांना तुम्ही कसले विरोधी पक्ष नेता… तुम्ही तर विनोदी पक्ष नेता अशी टीका करताना दाखवण्यात आले आहे. पहिल्या चित्रात आक्रम असलेले राज ठाकरे दुसऱ्या चित्रामध्ये हात जोडून पक्षाला विरोधी पक्ष बनवण्यासाठी विनवणी करताना दाखवण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीत लावरे तो व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी भाजपच्या विकास कामांची पोलखोल केली. लोकसभेत एकही उमेदवार उभा न करता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केल्याचे आरोप विरोधकांनी केले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यामध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे मतदारांना करत आहेत.

Visit : Policenama.com 

You might also like