तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय सुद्धा बनवू शकता Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे पद्धत?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या आधार कार्ड एक महत्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. बहुतांश सरकारी योजनांसाठी आधार कार्ड ( Aadhaar Card. ) अनिवार्य आहे. यापूर्वी जर कुणाला पहिल्यांदा आधार कार्ड ( Aadhaar Card. )बनवायचे असेल तर त्यासाठी आयडी आणि अ‍ॅड्रेस प्रूफची आवश्यकता होती. मात्र, आता जर तुमच्याकडे कोणतेही आयडी नसेल, तरी सुद्धा आधार कार्ड बनवू शकता.तर जाणून घेवूयात कसे ?

विना डॉक्युमेंट असे बनवा आधार कार्ड
कोणत्याही डॉक्युमेंटशिवाय आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल. तिथे इंट्रोड्यूसरच्या मदतीने सहजपणे आधार कार्ड बनवले जाईल.
इंट्रोड्यूसरला यूआयडीएआयच्या क्षेत्रीय कार्यालयाद्वारे तैनात केले जाते.
मात्र, इंट्रोड्यूसरकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
आधार सेंटरवर सामान्य प्रक्रियेद्वारे आधार बनवले जाईल आणि 90 दिवसांत तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने कार्ड पाठवले जाईल.

इंट्रोड्यूसर अर्जदाराची ओळख आणि अ‍ॅड्रेस कन्फर्म करण्याचे काम करतो.
सोबतच एन्रॉलमेंट फॉर्मवर साईन करण्याचे काम करतो.
आयडीएआयच्या गाईडलाईननुसार इंट्रोड्यूसर अर्जदाराच्या नावाने सर्टिफिकेट जारी करावे लागते, जे तीन महिन्यासाठी व्हॅलिड असते.
आधार बनण्याच्या प्रकियेदरम्यान इंट्रोड्यूसरचे तिथे उपस्थित असणे अनिवाय असते.

‘नागिन-3’ फेम पर्ल व्ही पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मोदी सरकार LIC बाबत घेणार मोठा निर्णय ! मेगा IPO संदर्भातील हालचालींना वेग

राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

हे ही वाचा

जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय तर ‘हा’ सर्वोत्तम पर्याय, मोदी सरकार देखील करणार मदत; जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन बिझनेस सुरू करण्याचा प्लान करत असाल तर एक न्यू बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सध्या बांबूच्या प्रॉडक्टला बनवून चांगली कमाई करू शकता.
सामान्यपणे पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर सर्वात जास्त केला जातो.
परंतु प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे धोकादायक असल्याने केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर प्रतिबंध लावला आहे.

सरकारने प्लास्टिकच्या बाटल्यांना नवीन पर्याय काढला आहे.
हा पर्याय म्हणून एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत खादी ग्रामोद्योग आयोगाने बांबूच्या बाटल्यांची निर्मिती केली होती, जी प्लॅस्टिकच्या ऐवजी वापरली जाते.

एका बाटलीची किंमत जाणून घ्या
या बांबूच्या बाटलीची क्षमता किमान 750 एमएल असेल आणि तिची किंमत 300 रुपयांपासून सुरू होईल.
ही बाटली पर्यावरण अनुकूल असण्यासह टिकाऊ सुद्धा आहे.
मागील दोन ऑक्टोबरपासून खादी स्टोअरमध्ये सुरू झाली आहे.
तर केव्हीआयसी द्वारे अगोदरच प्लॅस्टिकच्या ग्लासच्या ऐवजी मातीच्या कुल्हडची निर्मिती सुरूकेली आहे.