ATM व्दारे ‘कर्ज’ देखील मिळतं अन् रेल्वे तिकिट देखील करू शकता ‘बुक’, मिळतात ‘हे’ 7 फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत आपण विचार करत असाल की एटीएमचा उपयोग फक्त पैसे काढण्यासाठीच होतो. परंतु आज आम्ही आपणास एटीएमच्या सात अशा सेवांबद्दल सांगणार आहोत ज्यातून आपल्याला खूप फायदा होईल. हे फार कमी लोकांना माहित असते की एटीएम वरून आपण लोन घेण्यासाठी अ‍ॅप्लाय करू शकतात आणि टॅक्स देखील भरू शकतो. याबरोबरच आपण आता रेल्वेचे तिकीट देखील बुक करू शकतात तसेच फिक्स्ड डिपॉजिटची सुविधा, इन्शोरंन्स पॉलिसी भरण्याची सुविधा, कॅश ट्रान्सफरची सुविधा, विविध बिल भरण्याच्या सुविधांसह अन्य काही सुविधा एटीएममार्फत प्रदान केल्या जातात. या सुविधांबद्दल जाणून घेऊया.
Tax
1) आयकर भरू शकता –
आयकर भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असून आपल्याला जर कर भरायचा असेल तर तो आपण एटीएमद्वारे देखील भरू शकतो. देशात अशा अनेक बँका आहेत जे ग्राहकांना त्यांच्या एटीएमद्वारे ही सुविधा पुरवत असतात. एटीएममधून प्राप्तिकर भरण्यासाठी प्रथम आपल्याला बँकेच्या वेबसाइटवर किंवा शाखेत या सुविधेसाठी नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतरच आपण एटीएमच्या मदतीने कर भरू शकता. जेव्हा आपल्या खात्यातून पैसे कपात केले जातात तेव्हा आपल्याला एक सीआयएन क्रमांक दिला जातो. आपण २४ तासांनंतर बँकेच्या वेबसाइटवर भेट देऊन त्याच सीआयएन नंबरवरुन चलन प्रिंट देखील करू शकतो.
Railway
2) रेल्वे तिकीट बुक करता येते
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रेल्वे इमारतींत असलेल्या अनेक एटीएमद्वारे ग्राहकांना तिकिट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. याअंतर्गत केवळ लांब अंतरासाठीच आरक्षित तिकिटे बुक केली जाऊ शकतात.
Electricity
3) टेलिफोन आणि विजेचे बिल देखील भरू शकतो
टेलीफोनचे बिल असो किंवा वीज बिल असो, आपण त्या बिलास एटीएमद्वारे भरू शकतो. मात्र बिल भरण्यापूर्वी आपल्याला एकदा बँकेच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. दूरध्वनी आणि विजेच्या बिलासह आपण एटीएमद्वारे गॅस बिले देखील भरू शकतो.
Insurence
4) आपण विमा पॉलिसीची रक्कम देखील भरू शकतो
एलआयसी (LIC), एचडीएफसी (HDFC) लाइफ आणि एसबीआय (SBI) लाइफ यासारख्या विमा कंपन्यांचे ग्राहकही त्यांच्या विमा पॉलिसीची रक्कम एटीएममधून भरू शकतात. यासाठी आपल्याजवळ पॉलिसी नंबर असणे आवश्यक आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास एटीएमच्या बिल पे विभागात जाऊन विमा कंपनीचे नाव निवडावे लागणार आहे. आता पॉलिसी नंबर, जन्मदिवस आणि मोबाइल नंबर टाकल्यानंतर आपण प्रीमियमची रक्कम प्रविष्ट करुन याची पुष्टी करू शकतो.
Loan
5) कर्जासाठीही अर्ज करू शकतात
एटीएमद्वारे आपण लोन घेण्यासाठी अ‍ॅप्लाय करू शकतो हे फार कमी लोकांना माहित आहे. छोट्या रकमेच्या पर्सनल लोनसाठी आपणास बँकेच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. देशात अशा अनेक बँका आहेत ज्या एटीएमद्वारे ग्राहकांना प्री अप्रूव्हड पर्सनल लोन (Pre Approved Personal Loan) देतात.
FD
६) मुदत ठेवीची सुविधा
आपण एटीएममधून फिक्स्ड डिपॉजिट (FD) जमा करू शकतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मेनूवर जाऊन तेथे नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. एटीएममध्येच आपल्याला डिपॉजिटचा कालावधी आणि रक्कम निवडण्याचा पर्याय मिळेल.
Money Transfer
7) रोख हस्तांतरण सुविधा
एवढेच नव्हे तर आपण एटीएमच्या मदतीने आपल्या खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसेही ट्रान्सफर करू शकतो. यासाठी आपल्याला ऑनलाइन किंवा शाखेत जावे लागणार आहे आणि ज्या खात्यात आपल्याला रक्कम हस्तांतरित करायची त्या खात्याची नोंदणी करावी लागेल. यामध्ये आपण एटीएममध्ये ४०,००० रुपयांपर्यंतचे हस्तांतरण करू शकतो.
ATM Fraud
तथापि, एटीएमद्वारे ग्राहकांबरोबर फसवणुक देखील होऊ शकते. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँकांनी अनेक नियम देखील बनवले आहेत. कठोर नियम असूनही ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकरणे समोर आले आहेत. एटीएमद्वारे फसवणूक कशा प्रकारे केली जाऊ शकते ते जाणून घेऊ.

1) एटीएमच्या आसपास सिक्रेट कॅमेरा असू शकतो

2) एटीएम मशीनभोवती उभी असलेली एखादी व्यक्ती आपला एटीएम पिन बघून चुना लावू शकतो.

3) फसवणूक करणारे कार्ड क्लोनिंगद्वारे आपल्या एटीएम कार्ड पर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी फसवणूक करणारे एटीएम मशीनवर स्कीमर नावाचे मशीन लावतात.

4) वस्तू खरेदी करताना, मॉलमध्ये किंवा इतर कुठेही कार्डद्वारे पैसे दिल्याने फसवणूकीची शक्यता वाढत असते. त्यामुळे आपले कार्ड आपणच स्वाईप करा आणि त्यात पासवर्ड देखील आपणच टाका.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/