तुमच्याकडे आहे ‘हे’ 1 रुपयाचं दुर्मिळ नाणं तर घर बरबसल्या मिळतील 10 कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना महामारीमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात जर तुम्हाला जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही घर बसल्या करोडपती होऊ शकता. जर तुमच्याकडे ब्रिटीशकालीन एक रुपयांच नाणं असेल तर तुम्ही त्या नाण्याचा लिलाव करुन 10 कोटी रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता. जाणून घ्या 1 रुपयांच्या नाण्यावर 10 कोटी रुपये कसे कमावयाचे.

दुर्मीळ नाण्याची किंमत 10 कोटी रुपये

सध्या एक रुपयाच्या एका दुर्मीळ नाण्याला लिलावात साधारणपणे दहा कोटी रुपयांची किंमत मिळत आहे. हे 1885 मधील इंग्रजांच्या काळातील नाणं असून यावर इसवी सन 1885 असं लिहिलेलं आहे. तुमच्याकडे असं नाण असेल तर ते ऑनलाइन लिलावासाठी टाकता येईल आणि ऑनलाइन विक्रीत 9 कोटी 99 लाख रुपये म्हणजेच जवळपास 10 कोटी रुपये कमावता येतील.

लिलावात कसं सहभागी होता येईल

या दुर्मीळ नाण्याच्या लिलावासाठी तुम्हाला ओएलएक्सवर जावं लागेल. इंडिया मार्ट (indiamart.com) या वेबसाईटवरही त्याचा लिलाव करता येईल. यासाठी या वेबसाईटवर जाऊन तुमची माहिती भरुन तुमचं एक अकाउंट उघडा. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या या दुर्मीळ नाण्याचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढा आणि तुमच्या अकाउंटवर ते फोटो शेअर करा. या नाण्याची माहिती द्या आणि विक्रीसाठी हे नाणं टाकत असल्याचे जाहीर करा. यापुढचे काम संबंधित वेबसाइट करेल.

ओएलएक्स आणि अशा काही साईट्सवर दुर्मीळ वस्तूंच्या शोधात असलेले चाहते, संग्राहक दुर्मीळ नाणी, वस्तू यांची वाटेल तेवढी किंमत देऊन खरेदी करतात. सध्या एक रुपयाच्या या विशिष्ट नाण्याला मागणी आहे. अर्थात अशा प्रत्येक नाण्याला हीच किंमत मिळेल असं नाही. हे त्या वेळच्या खरेदीदारावर अवलंबून असू शकतं.