इटलीच्या ‘या’ खास शहरात तुम्ही खरेदी करू शकता ‘फक्त’ 78 रुपयांमध्ये ‘आशियाना’, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – इटलीतील टारांटोमध्ये केवळ 78 रुपये म्हणजेच 1 यूरोमध्ये एक घर खरेदी करता येऊ शकते. इटलीमधील हे पहिले शहर आहे ज्यामध्ये अशी आगळी वेगळी सुरुवात करण्यात आलेली आहे. या परिसरातील लोकांची संख्या वाढवणे हा त्यामगचा हेतू आहे. सुरुवातीला लोकांना पाच घर विकली जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इटलीतील बंदराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या 40 हजार इतकी होती. मात्र सध्या त्याठिकाणची लोकसंख्या केवळ तीन हजार इतकी आहे. त्यामुळे अशा 25 हजार घरांची निवड करण्यात अली आहे ज्यांना स्वस्त दरात विकता येईल.

2011 च्या सुरुवातीला सिसिलीची राजधानी पलेर्मो येथे असलेल्या गांगी शहरात घर 78 रुपये म्हणजेच एक युरोमध्ये एक घर विकण्याची योजना सुरू केली गेली. यानंतर सुमारे दीडशे घरे विकली गेली. लोकांनी त्यांना विकत घेतले ज्यानंतर परिसराची लोकसंख्या वाढली आणि रौनक परत आला.

2024 पर्यंत पर्यावरण पूरक होईल परिसर
2019 मध्ये, सिसलीच्या बिवोना, संबुका आणि मुसोमेलीमध्ये अशाच ऑफर देण्यात आल्या. इटलीच्या वायव्येकडील लोकेना हे देखील अशाच एक गावात आहे जेथे लोकांना घरी घेण्यासाठी एकूण खर्च 7 लाख किंवा 9,000 युरो होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारी फांसेस्का विग्गिएनो ने सांगितले की 78 रुपयांना मिळत असलेल्या घराबद्दल लोकांनी अनेक इतर शहरांमधून देखील माहिती मिळवायला सुरुवात केली आहे. स्टील प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे या ठिकाणी लोकवस्ती कमी होऊ लागली होती. मात्र 2024 पर्यत येथील वातावरण पर्यावरण पूरक होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.