जर तुम्हाला ‘हिंदी’ येत असेल तर तुम्ही व्हाल ‘मालामाल’, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाई वाढत असताना आता खर्चावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. नोकरी करुन पैसे कमावण्याची अनेकांची इच्छा असते, परंतू अनेकांना आपल्या आवडीचे काम करता येत नाही. अशात आता क्रेज आहे ती हिंदी भाषेची. ही हिंदी तुमचे पैसे कमावण्याचे माध्यम ठरु शकते. यासाठी खूप सारे शिक्षण असण्याची गरज नाही, अट एवढीच की तुमचे हिंदी चांगले हवे.

1. तुम्हाला चांगले हिंदी लिहिता येत असेल तर यातून तुम्ही पैसे कमावू शकतात. हिंदीत ब्लॉग लिहून तुम्ही घरबसल्या पैसै कमावू शकतात. ब्लॉग तयार करणे सोपे आहे, त्यासाठी तुम्हाला काही फक्त हिंदीतून लिहिता आले पाहिजे. तुमच्या ब्लॉगची संख्या वाढली की तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जाहिरात सुरु करुन पैसे कमावू शकतात.

2. आज अनेक वेबसाइट हिंदीमध्ये आहेत. हिंदीचा वापर वाढत आहे. ई – ट्युशनची संख्या वाढत आहे. तुम्ही चांगले शिकवू शकत असाल तर तुम्ही या माध्यमातून पैसे कमावू शकतात.

3. अमेझॉन इंडिया नुकतेच हिंदीमध्ये लॉन्च झाले आहे, या माध्यमातून तुम्ही तयार केलेल्या वस्तू अमेझॉनवर विकू शकतात आणि वस्तू संबंधित माहिती हिंदीमध्ये देऊ शकतात. नोंदणी करुन तुम्ही तुमच्या वस्तू यावर विकू शकतात.

4. जर तुम्ही हिंदी भाषी असाल तर हिंदीचा वापर इंटरनेटवर वेगाने वाढत आहे. तुम्ही हिंदी भाषेसंबंधित किंवा इतर माहिती देणारा चॅनल यू ट्यूबवर सुरु करु शकतात. गुगल अप्रुव्हल नंतर तुम्ही त्या माध्यमातून पैसे कमावू शकतात. जेवढे तुमचे व्हिडीओ अधिक तुम्हाला मिळणारा पैसा जास्त असेल.

5. तुम्ही हिंदी रिसर्च संबंधित संस्थेबरोबर काम करु शकतात. तसेच रिसर्च संबंधित काम तुम्ही संस्थेकडून घेऊन घरी बसून करु शकतात आणि त्यातून पैसे कमावू शकतात.