खुशखबर ! २ लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, प्रत्येक महिन्याला कमवा १ लाख रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे तुमची जमीन आहे आणि त्या जमीनीचा वापर तु्म्ही तुमच्या व्यवसायासाठी करु इच्छित असाल तर तुम्ही या व्यवसायासाठी गुंतवणूक केली पाहिजे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जवळपास २ लाख रुपये गुंतवावे लागतील. या गुंतवणूकीनंतर तुम्ही दरमहा १ लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकतात. हा व्यवसाय आहे विटा बनवण्याचा.

असा सुरु करता येईल व्यवसाय –

शहरीकरण आणि विटांची कमी उपलब्धता होत असल्याने या समस्येपासून सूटका मिळवण्यासाठी आता बिल्डर फ्लाई अॅश विटांचा वापर करत आहेत. या विटेची निर्मीती वीज यंत्रातून निघणाऱ्या राखेपासून, सीमेंट आणि बरीक खडींपासूनच्या मिश्रणातून केली जाते. कोणतीही व्यक्ती २ ते २.५ लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरु करु शकतात. यात मशिनच्या माध्यमातून विट उत्पादन करण्यात येते. यासाठी जवळपास ५ – ६ लोकांची आवश्यकता असते. ही मशीन रोज जवळपास ३००० विटांचे उत्पादन करु शकते. म्हणजेच महिन्याला तुम्ही जवळपास ९० हजार विटांचे उत्पादन करु शकतात. या गुंतवणूकीत कच्च्या मालाचा समावेश करण्यात आलेला नाही.

असे होणार उत्पादन –

१. एका दिवसाला ३००० विटांचे उत्पादन
२. एका महिन्यात ९० हजार विटांचे उत्पादन
३. ९० हजार विटांची किंमत ४,५०,००० रुपये
४. १ विट बनवण्यासाठी येणारा खर्च जवळपास ३.५० रुपये
५. ९० हजार विटा बनवण्यासाठी येणारा खर्च – ३,१५,००० रुपये
६. सर्व खर्च गेल्यास एकूण बचत १,३५,००० रुपये

२० दिवसात उभा राहिलं व्यवसाय-

यासाठी लागणाऱ्या मशीनची किंमत १० ते १२ लाख रुपये आहे. यात कच्चा मालाच्या मिश्रणापासून ते विट बनवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया मशीन करते. या स्वयंचलित मशीन मधून १ तासात १००० विटा निर्माण केल्या जाऊ शकतात. या मशीनच्या आधारे तुम्ही एक महिन्यात ३ ते ४ लाख विटांची निर्मिती करु शकतात. जेवढी आधिक विक्री तेवढे आधिक उत्पन्न. हा व्यवसाय २० – २५ दिवसात सुरु होऊ शकतो.

या योजनेच्या माध्यमातून घेऊ शकतात कर्ज-

बँकेतून कर्ज घेऊन तुम्ही व्यवसाय सुरु करु शकतात. पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना या अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज देण्यात येते. या योजने अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून तुम्हाला सबसीडी चा लाभ मिळेल. या शिवाय तुम्ही मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. मुद्रा योजने अंतर्गत कोणत्याही गॅरंटी शिवाय कमी व्याज दरात विविध श्रेणीतून ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

Loading...
You might also like