सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरू करा अन् ‘कमवा’ महिन्याला १ लाखाहून अधिक रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी ग्रामीण आणि आदिवसी भागात रोजगारासंबंधी संधी ग्रामीण तरुणांना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात मधाचे उत्पादन घेण्यासाठी सरकार प्रोस्ताहन देणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लवकरच यावर एक योजना बनवणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तरुणांना मधमाशा पालनासाठी १ लाख पेक्षा आधिक डबे दिले आहेत. आयोग यासाठी ‘हनी मिशन’ राबवत आहे. जर तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. तुम्ही यातून हनी हाऊस आणि हनी प्रोसेसिंग प्लाँट उभारू शकतात.

काय आहे हनी मिशन
खादी ग्रामोद्याेग विभागने हनी मिशन योजना सुरु केली आहे. यामाध्यमातून शेतकरी आणि पैसे कमवण्याची इच्छा बाळगणारे लोक रोजगाराला सुरुवात करु शकतात. तुम्ही या हनी मिशनच्या माध्यमातून मधमाशा पाळून अतिरिक्त कमाई करु शकतात. आता असे तंत्रज्ञान आले आहे की, ज्यात मध काढताना मधमाशा मरत देखील नाहीत. यातून फक्त शेतकरीच नाहीत तर तरुणांना देखील रोजगार मिळवू शकतात.

सरकार करणार मदत
जर तुम्ही या योजनेअंतर्गत हनी प्रोसेसिंग प्लाँट उभारु इच्छितात तर आयोगाकडून तुम्हाला ६५ टक्क्यापर्यंत कर्ज मिळू शकते आणि खादी ग्रमोद्योग तुम्हाला २५ टक्के सब्सिडी देईल. म्हणजेच तुम्हाला फक्त १० टक्के पैसा लावण्याची गरज भासेल.

व्यवसाय सुरु करण्यासाठी किती भांडवल लागेल
जर तुम्ही २० हजार किलोग्राम दरवर्षाला मध बनवू इच्छितात तर तुम्हाला यासाठी जवळपास २४.५० लाख रुपये खर्च येईल. यात तुम्हाला जवळपास १६ लाख रुपयांपर्यत कर्ज मिळेल. तर मार्जिन मनी म्हणून ६.१५ लाख रुपये मिळतील आणि तुम्हाला स्वत:ला जवळपास २.३५ लाख रुपये लावावे लागतील.

१ लाख महिना कमवा
जर तुम्ही वर्षाला २० हजार किलोग्राम मध तयार करत असाल तर त्याची किंमत २५० रुपये प्रति किलोग्राम असेल. यात ४ टक्के कामगारांना द्यावे लागले. तरी देखील तुम्हाला वर्षाला मध विक्रीतून ४८ लाख रुपये मिळतील. यातून बाकी सर्व खर्च ३४.१५ लाख रुपये कमी करण्यात आला तर तुम्हाला वर्षाला १३.८५ लाख रुपये मिळतील. म्हणजेच महिन्याला १ लाख रुपये तुम्ही कमावू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच