‘या’ पध्दतीनं टाटाच्या ‘कार’वर मिळातोय 2 लाखापर्यंतचा ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात नव्या नियमानुसार 1 एप्रिलपासून बीएस – 6 वाहनांचीच विक्री करता येणार आहे. त्यामुळे निर्माता कंपन्या देखील आपल्या वाहनांच्या मॉडेलचे बीएस 6 वर्जन बाजारात आणत आहे. तर दुसरीकडे बीएस 4 वाहनांची विक्री 31 मार्चपूर्वी करायची असल्याने वाहनांच्या खरेदीवर मोठ मोठे डिस्काऊंट मिळत आहेत. टाटा हॅरियरपासून ते टाटा नेक्सॉनपर्यंत अनेक वाहनांवर 2 लाखापर्यंतचे डिस्काऊंट दिले जात आहेत.

टाटा टिगोर (Tata Tigor) –
टाटा टिगोर कार टाटा कंपनीच्या पसंतीच्या कारपैकी एक कार आहे. या कारच्या बीएस 4 मॉडेलच्या डिझेल वेरियंटमध्ये 70,000 रुपयांपर्यंत तर पेट्रोल वेरियंटमध्ये 60,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळत आहेत.

टाटा टियागो (Tata Tiago) –
ही कार कंपनीच्या एंट्री लेवल कार आहेत. याच्या बीएस 4 च्या मॉडेलमधील डिझेल वेरियंटवर 50 हजार आणि पेट्रोल वेरियंटमध्ये 45 हजार रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. यात कॉर्पोरेटमध्ये डिस्काऊंट, कॅश डिस्काऊंट आणि एक्सचेंज डिस्काऊंट देखील देण्यात येत आहे.

टाटा बोल्ट (Tata Bolt) –
टाटाच्या या कारवर डिलरशिप्स 80,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर देत आहे. भारतात 1 एप्रिलपासून बीएस – 6 इंजिनाच्या गाड्यांची विक्री करता येणार आहे.

टाटा हेक्सा (Tata Hexa) –
या कारवर 2 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसेच 50 हजार रुपये अॅडिशनल डिस्काऊंट देखील मिळत आहे. या कारची किंमत 13 ते 14 लाख रुपयांपर्यंत आहे. या संबंधित सर्व डिस्काऊंट आणि डिलची माहिती ग्राहकांनी जवळच्या डिलरशिपकडून घ्यावी, कारण वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे बेनिफिट्स असू शकतात.