Dhanteras 2020 : ‘धनतेरस’च्या दिवशी खरेदी करू शकत नसाल सोनं-चांदी तर घ्या ‘या’ 5 गोष्टी, लक्ष्मी माता ‘बक्कळ’ धन-दौलतीनं घर भरेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dhanteras Parva 2020 : प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धन्वंतरी जयंतीसुद्धा साजरी केली जाते. धन्वतरी जयंती म्हणजेच धनतेरस होय. यादिवशी धातुची वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, सोने-चांदीची वस्तू खरेदी केल्याने घरात धन-वैभव आणि सूख-समृद्धी येते. परंतु, तुम्ही जर सोने-चांदीसारखी महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर यावर सुद्धा मार्ग आहे. आपण अशा वस्तूंची माहिती घेणार आहोत, ज्यांच्या खरेदीने तेवढाच लाभ होतो, जेवढा सोने-चांदीच्या खरेदीत.

या आहेत त्या वस्तू

पितळ :
धनत्रयोदशीला पितळेची वस्तु खरेदी केल्याने तेवढाच लाभ होतो, जेवढा सोने-चांदीच्या खरेदीने होतो. पितळ शुप शुभ मानले जाते. पितळेच्या वस्तू खरेदी करून पूजा केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होऊ शकते.

धने :
धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खुप लाभदायक आहे. यामुळे धन वाढते. लक्ष्मी मातेला धने अर्पण करून पूजा करावी. याचे काही दाणे पेरल्यानंतर ते उगवल्यास वर्षभर घरात समृद्धीची वाढ होते.

झाडू :
झाडूला लक्ष्मीमातेचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीला झाडू घरी आणल्याने लक्ष्मी मातेचा प्रवेश होतो. याचे महत्व सोने-चांदीच्या बरोबरीने आहे.

अक्षता :
अक्षता म्हणजेच तांदुळ किंवा धान्य. धनत्रयोदशीच्या दिवशी धान्य किंवा तांदूळ घरी आणावेत. तांदूळ शुभ मानले जातात. धन-संपत्तीमध्ये वाढ होते. या दिवशी तांदूळ खरेदी करून आणल्याने धन, वैभव आणि ऐश्वर्यात वाढ होते. याचे महत्व सोन्या-चांदीएवढेच आहे.

जऊ :
जऊ हे सोन्यासमान आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जऊ खरेदी केल्याने सोने-चांदी खरेदी केल्यासमान फळ मिळते.