LIC च्या प्रिमिअमचा भरणा घरबसल्या Paytm वरून ‘या’ पध्दतीनं करा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन : LIC (जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा मंडळ) साठी गतवर्षातील कोरोना काळात संधी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एलआयसीने नवीन हप्त्यांपोटी १.८४ लाख कोटी रुपये असे आजवरचे सर्वोच्च उत्पन्न कमावले आहे. अर्थजगतासाठी आव्हानात्मक ठरलेल्या या काळात LIC ची व्यावसायिक कामगिरी मात्र चमकदार ठरली आहे. व्यक्तिगत विम्याच्या बाबतीत पहिल्या वर्षाच्या हप्त्यापोटी LIC उत्पन्न हे ५६,४०६ कोटी रुपये आहे, जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत १०.११ टक्के वाढले आहे.

LIC ने गेल्या वर्षात २.१० कोटी पॉलिसींची विक्री केली, ज्यापैकी ४६.७२ लाख पॉलिसी या केवळ मार्च २०२१ मध्ये विकल्या गेल्या आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत २९८.८२ टक्के अशी वाढ राखणारे प्रमाण आहे. दरम्यान LIC नं आता आपल्या ग्राहकांना हप्त्याची रक्कम भरण्यासाठी नवा आणि सोपा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. LIC नं यासाठी पेटीएमसोबत हातमिळवणी केली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार कंपनीनं पेटीएमला हप्त्यांचा भरणा करण्यासाठी अधिकृत केलं आहे. यापूर्वी एलआयसीनं अन्य पेमेंट गेटवेंसोबतही हातमिळवणी केली होती. कंपनीला आता सर्वाधिक ग्राहकांकडून हप्त्यांची रक्कम डिजिटल पेमेंटद्वारेट मिळते. नव्या कराराअंतर्गत पेमेंट सुविधा ही सोपी केली जाईल. तसंच ग्राहकांना हप्ते भरण्यासाठी अनेक पर्यायही दिले जातील, असं कंपनीनं सांगितलं.

याशिवाय कंपनी पेमेंट चॅनलसाठी अधिक बँका आणि वॉलेट्ससोबत करार करेल, असंही सांगण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ पेमेंट प्लॅटफॉर्मनं यासाठी बोली लावली होती. परंतु यात पेटीएमनं बाजी मारली. पेटीएमकडे डिजिटल सेवेचा अनुभव आहे. तसंच यामुळे युपीआय आणि कार्ड्स सेगमेंटमध्ये त्याचं अस्थित्वही मजबूत करतं. ग्राहकांना पेटीएमद्वारे हप्ता भरायचा असेल तर प्रथम पेटीएमवर एलआयसी सर्च करावं लागले. त्यानंतर तुम्हाला पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुमचा प्रिमिअम किती आहे हे दिसेल. त्या ठिकाणी असलेल्या प्रोसिड पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला हप्ता भरता येईल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एलआयसीला डिजिटल पेमेंटद्वारे मिळणारी रक्कम वाढली आहे. एलआयसीच्या डिजिटल ट्रान्झॅक्शन्सची संख्या ८ कोटी आहे. कोरोनाच्या काळातील संचारबंदीचे निर्बंध असतानाही, दावे निवारणाच्या आघाडीवर LIC ने खूप चांगली कामगिरी केली. एकूण १.३४ लाख कोटी रुपयांचे विमेदारांचे दावे मंजूर केले गेले, जो नवीन उच्चांक आहे.

LIC कर्मचाऱ्यांना तब्बल २५ टक्के वेतनावाढ सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. तसेच कामकाजाचा ५ दिवसांचा आठवडा केंद्र सरकारने मान्य केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच सुमारे २.१९ कोटी विमाधारकांचे मुदतपूर्ती दावे सरलेल्या वर्षभरात मंजूर करण्यात आले. ९.५९ लाख मृत्यू दावे मंजूर करून, १८,१३७.३४ कोटी रुपयांची भरपाई करण्यात आली. दरम्यान, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या कठीण काळातही केंद्र सरकारने LIC कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.