पोलीसनामा ऑनलाईन टीम : बरेच लोक Truecaller वापरतात. या अॅपच्या मदतीने तुम्हाला माहित नसलेला नंबर मिळू शकतो. मोबाईलवर Truecaller डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्यांना त्यावर नोंदणी करावी लागते. नोंदणीच्या वेळी तुम्ही वापरलेले नाव हेच दुसऱ्या युजरला Truecaller वर दिसते. यामध्येही तुमच्या संपर्काचा डेटा Truecaller च्या डेटा बेसमध्ये चालला जातो. त्यामुळे काही वेळेस ते नाव युजर्सना दिसते जे त्या नंबरला कोणत्यातरी वापरकर्त्यांनी सेव केले असेल. त्यामुळे काहीवेळा लोक त्रस्त होऊन जातात.
जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर Truecaller काढले असेल तरीही त्यामधील डेटा त्यांच्या सर्व्हरवर कायम राहतो. Truecaller ला अनइंस्टॉल केल्याने काही होत नाही, यासाठी आपला डेटा Truecaller च्या सर्व्हरवरून हटवावा लागेल. येथे तुम्हाला असा मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही Truecaller वरील डेटाबेसमधून तुमचा नंबर काढू शकता. Truecaller वर हा नंबर शोधल्यानंतर कोणतेही नाव दिसणार नाही. यासाठी आपण प्रथम Truecaller अॅपवर जा. येथून अॅप सेटिंग्जवर जा आणि प्रायव्हसी सेंटर सेटिंगमध्ये जा. त्यानंतर अकाउंट डिअॅक्टिव करा.
त्यानंतर Truecaller ला फोनमधून अनइंस्टॉल करा. ऍप अनइंस्टॉल केल्यानंतर https://www.truecaller.com/unlisting या लिंकवर जा. येथे तुमचा फोननंबर तुमच्या कंट्री कोडनुसार टाका. फोन नंबर टाकल्यानंतर कॅप्चा भरा. त्यानंतर अनलिस्ट फोन नंबरवर क्लिक करा. फोन नंबर अनलिस्ट झाल्यानंतर २४ तास वेळ लागू शकतो. २४ तासांनंतर तुम्ही तुमचा फोन नंबर दुसऱ्या मोबाईलमधील Truecaller वर चेक करा. जर तुमचे नाव दिसत नसेल तर तुमचा नंबर Truecaller वरून निघून गेला असेल.