सावधान ! वाहनांसाठी ‘अनिवार्य’ झालेला ‘फास्ट टॅग’ हा ‘येथून’ खरेदी करा , जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, टोल प्लाझा व्यवस्थेला बंद करता येणार नाही आणि राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझावर लागणाऱ्या रांगेतील सर्व वाहनांवर चार महिन्यात फास्ट टॅग लावणे अनिवार्य करण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधित माहिती दिली आहे. लोकसभेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी संबंधित अनुदानाच्या मागणीवर होणाऱ्या चर्चेला उत्तर देताना सांगितले की, फास्ट टॅग लावल्याने टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी लागणारी रांग बंद होईल. यामुळे पुढील चार महिन्यात सर्व वाहनांना अनिवार्य म्हणून हा टॅग लावण्यास सांगण्यात आले आहे. नव्या वाहनांवर विक्री करतानाच हे टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वच नव्या आणि जुन्या गाड्यावर हा फास्ट टॅग लावण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कुठून खरेदी करु शकतात फास्ट टॅग

१. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संचलित टोल नाके

२. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक

३. पेटीएम, अ‍ॅमेझॉन

४. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप

५. नॅशनल हायवे अथॉरिटीचे ‘माय फास्ट अ‍ॅप’

ही लागतात कागदपत्र

– गाडीचे नोंदणीचे सर्टिफिकेट

– गाडी मालकाचे पासपोर्ट साईज फोटो

– गाडी मालकाचे केवायसी डॉक्युमेंट, उदा. – आयडी प्रुफ, अ‍ॅड्रेस प्रुफ

– फास्ट टॅग करताना सर्व ओरिजनल कागदपत्रे बाळगा सोबत

असे करा रिचार्ज

फास्ट टॅगला चेक, क्रेडिट – डेबिट कार्ड, एनईएफटी, आरटीजीसी या आधारे ऑनलाइन रिचार्ज करता येईल. एकावेळी तुम्ही कमीत कमी १०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत रक्कमेचे फास्ट टॅग रिचार्ज करु शकतात.

याशिवाय तुम्ही बचत खात्याला फास्ट टॅग जोडू शकतात. टोल नाक्यावर फास्ट टॅगचा वापर झाल्यावर तुमच्या बँक खात्यातून आपोआप रक्कम कापल्या जाईल. या वापरानंतर तुम्हाला मोबाईलवर मेसेज देखील येईल. फास्ट टॅग अकाऊंटला कमी पैसे असल्यास त्याचा अलर्ट देखील तुम्हाला मेसेजमधून येईल. ज्या बँकांकडून आणि एजेंसीवर फास्ट टॅग खरेदी करतात, त्याच्या पोर्टलवरुन देखील तुम्ही ऑनलाईन रिचार्ज करु शकतात.

 

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका