‘कोरोना’वरील उपचारासाठी ‘या’ पध्दतीनं घेऊ शकता तुम्ही विम्याचा लाभ, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढत आहे. अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात तर आरोग्य विम्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी झालेल्या मोठ्या खर्चाचे ओझे पेलणे अधिक सोपे जाते. जर तुम्ही किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं आरोग्य विमा घेतला असेल आणि दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या विमा रकमेवर क्लेम केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर उपचारासाठी देखील विम्याद्वारे क्लेम करता येतो. हा क्लेम करण्यासाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

क्लेम दोन प्रकारचे असतात

दोन प्रकारचे विमा क्लेम असतात. पहिला कॅशलेस क्लेम आणि दुसरा रिएम्बर्समेंट क्लेम. या बाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीच्या वेबसाईटने दिले आहे.

कैशलेस क्लेम

विमाधारकाने कॅशलेश क्लेमचा पर्याय निवडला असेल, तर रुग्णाला कॅशलेस सुविधेचा लाभ मिळतो. त्याद्वारे विमा कंपनी संलग्न असलेल्या निवडक रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार करण्यात आले तर विमा पॉलिसीच्या अटींनुसार, देय असलेल्या उपचार खर्चाची काही रक्कम विमा कंपनी प्रदान करते. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यावर त्याच्या हॉस्पिटलायझेशनसाठी आणि उपचारांसाठी झालेल्या सर्व खर्चाचे बिल टीपीए (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) कडे किंवा डायरेक्ट विमा कंपनीकडे पाठवले जाते. टीपीए किंवा विमा कंपनी ते बिल हॉस्पिटलला आदा करते. आयआरडीएच्या नवीन नियमानुसार, कोरोनावरील उपचारांचा देखील कॅशलेस उपचारांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

रिएम्बर्समेंट क्लेम

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंतचा सर्व खर्च पॉलिसी होल्डरने करायचा आणि हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आरोग्यविमा कंपनीकडे खर्चाच्या परताव्यासाठी सर्व कागदपत्रांसह अर्ज करायचा. त्यानंतर आरोग्यविमा कंपनी सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन खर्चाची रक्कम पॉलिसी होल्डरला आदा करते. विमा कंपनीकडे रकमेचा दावा सहसा 5 दिवसांच्या आत निकाली काढला जातो.

कॅशलेश क्लेमसाठी कसा अर्ज करायचा

कॅशलेश क्लेमसाठी अर्ज करण्यासाठी विमाधारकाला रुग्णालयाच्या विमा डेस्कशी संपर्क साधावा लागले. याठिकाणी विमाधारकाला अर्ज दिला जातो. उपचार करणाऱ्या डॉक्टरांची त्यावर सही असणे आवश्यक आहे. तो अर्ज भरल्यानंतर विमा कंपनीकडे पाठवला जातो. अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर विमा कंपनी उपचार खर्चाची भरपाई करेल. उपचार करण्यापूर्वी 4 ते 7 दिवस आधी मंजुरी घेणे आवश्यक आहे. विमाधारकाला विमा कंपनीद्वारे जारी करण्यात आलेलं आणि विमा डेस्कनं भरलेलं पूर्व-मान्यता पत्र, विमा कंपनीनं दिलेलं ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड याच्या झेरॉक्स द्याव्या लागतील. उपचार झाल्यानंतर मूळ बिल आणि उपचारासंबंधीचे प्रमाणपत्र रुग्णालयात सादर करावे लागले.

रिएम्बर्समेंट क्लेमसाठी लागणारी कागदपत्रे

रिएम्बर्समेंट क्लेम करण्यासाठी, विमाधारकाला विमा कंपनीच्या वेबसाईटवरुन आवश्यक कागदपत्रे डाऊनलोड करावी लगतील. अथवा विमा कंपनीच्या ऑफिसमधून ती प्राप्त करावी लागतील. या कागदपत्रांसह ग्राहकांना मूळ वैद्यकीय बिल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. या कागदपत्रांमध्ये क्लेम फॉर्म, बँक स्टेटमेंट, आयडी कार्डर्स, हॉस्पिटल डिस्चार्ज पेपर, चेक अँड डायग्नोसिस रिपोर्ट आणि बिले,हॉस्पिटल आणि फार्मासीची बिलं तसंच पेमेंट रिसीट आणि प्रिस्क्रिप्शन यांचा समावेश आहे. अपघात झाल्यानं रुग्णालयात दाखल झाल्यास पोलिस तक्रारीची अर्थात FIR कॉपी विमा कंपनीला देणे आवश्यक आहे.