Aadhaar Card वर असलेल्या फोटोनं तुम्ही ‘समाधानी’ नाही का? मग आजच बदला, खुपच सोपीय प्रोसेस, जाणून घ्या

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) सध्या अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट आहे. परंतु अनेकजण आधार कार्डवरील (Aadhaar Card) फोटोवर समाधानी नसतात. या खराब फोटोमुळे अनेकदा थट्टा सुद्धा केली जाते. तुम्हाला सुद्धा हा फोटो पसंत नसेल तर तो आता सहजपणे बदलू शकता. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) आधार कार्डधारकांना Aadhaar Card आधारवरील आपला फोटो अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. आधारवर चांगला फोटो लावण्याची सोपी पद्धत आम्ही सांगणार आहोत. जवळच्या नामांकन केंद्रावर जाऊन हे करू शकता. जाणून घेवूयात काय आहे प्रोसेस…

आधार कार्डचा फोटो बदलण्याची ही आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेप 1. सर्वप्रथम यूआयडीएआयची वेबसाइट uidai.gov.in वर लॉग इन करा आणि आधार नावनोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.

स्टेप 2. हा आधार नावनोंदणी फॉर्म भरून जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जमा करा.

स्टेप 3. आता आधार नावनोंदणी केंद्रावर कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल घेईल.

स्टेप 4. आता आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.

स्टेप 5. आता आधार नामांकन केंद्राचा कर्मचारी शुल्क म्हणून 25 रुपये+जीएसटी घेऊन तुमच्या आधार कार्डवरील फोटो अपडेट करेल.

स्टेप 6. आधार नावनोंदणी केंद्राचा कर्मचारी तुम्हाला यूआरएनसह एक स्लिप सुद्धा देईल.

स्टेप 7. तुम्ही या यूआरएनचा उपयोग करून हे चेक करू शकता की तुमचा आधार कार्डचा फोटो अपडेट झाला आहे किंवा नाही.

स्टेप 8. आधार कार्ड फोटो अपडेट झाल्यानंतर, नवीन फोटोसह एक अपडेटेड आधार कार्ड युआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येऊ शकते.

 

Also Read This : 

 

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

 

Lockdown कसा उठवायचा याबद्दल ICMR ने ठरवले निकष, म्हणाले…

 

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !

EPFO नं पुन्हा दिली PF अकाऊंटमधून पैसे काढण्याची ‘विशेष’ सूट, केवळ 3 दिवसात मिळेल रक्कम; जाणून घ्या

 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या