Photos : मराठमोळ्या सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस लुकची सोशलवर चर्चा !

पोलिसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या स्टाईल आणि लुकमुळे ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. असेच काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो पुन्हा व्हायरल झाल्याने सई सोशलवर चर्चेत आली आहे. सोशलच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.

सईनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो आता चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांचीही पसंती मिळताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी सईच्या फोटोंवर कमेंट करत तिचं ब्युटीचं कौतुक केलं आहे. सध्या सईचे हे ग्लॅमरस फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहेत. सई मराठी इंडस्ट्रीतील हॉट आणि आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

सईच्या वर्कफ्रंबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कृती सेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका असणार आहेत. हा सिनेमा मराठीतील मला आई व्हायचंय या सिनेमावर आधारीत आहे. सईने दुनियादारी, बालक पालक, वजनदार अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. हंटर, गजनी अशा हिंदी सिनेमातही तिनं भूमिका साकारली आहे.