फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावलं, म्हणाले – ‘तुम्हाला ‘या’ विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पडळकर यांच्या विधानाचा विरोध भाजप नेत्यांनी देखील केला आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भाजप नेत्यांवर आरोप केले जात आहेत. यावरून भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला पडळकर यांच्या विधानाचे राजकारण करायचे आहे असा आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उमटत आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी अमरावतीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्यावरून फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन केलं नव्हतं. गोपीचंद पडळकर यांच्या मुद्यावरून राष्ट्रवादीला राजकारण करायचं आहे. त्यामुळे पडळकरांच्या विधानावरून वाद कसा वाढवता येईल, असा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच जेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपविरोधात खालच्या पातळीवर टीका करत होते, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे खरे तर राष्ट्रवादीला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ठणकावलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like