‘ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता ?’ फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियोजित वेळेनुसार दुपारी १ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. कोरोना संकट, समृद्धी महामार्ग, मेट्रो ३ प्रकल्प, राज्यातील शाळांचा प्रश्न, पर्यटन, धार्मिक स्थळं, गड किल्ल्यांसदर्भातही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी कोरोना महामारीच्या संकटापासून ते राज्यातील विकासंदर्भातील विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. त्यावेळी, मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असं संबोधलं होतं. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे फडणवीसांच्या अहंकारी टीकेला प्रत्युत्तर दिलं आणि आता पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

ते अहंकार आहे की कर्तव्य हे आता तुम्हीच सांगा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, मेट्रो कारशेडच्या विषयावरुन सध्या थयथयाट केला जातोय, मी अहंकारी. जरुर मी अहंकारी आहे, माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच, २०२३ उर्वरीत २५ हेक्टरची जागा वापरल्यानंतर पुन्हा ती ५ हेक्टरची जागाही वापरली जाणार, पुन्हा आणखी जागा घेतली जाईल. एका लाईनसाठी आपण जंगल नष्ट करायचं का? आता कांजूरमार्ग येथे ४० हेक्टर जागा आहे, तो सर्वच प्रदेश ओसाड आहे. यापूर्वी आरेला केवळ मेट्रो ३ ची लाईन होणार होती. पण, आता कांजूर येथे मेट्रो ३,४ आणि ६ या तीन लाईनचे कारशेड आपण करू शकतो, हा फरक आहे. त्याहीपलिकडे, मेट्रोची लाईन ही अंबरनाथ व बदलापूरपर्यंत जाऊ शकते. पुढील ५० वर्षांच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचले आहे. आम्ही करतोय, ते अहंकार आहे की कर्तव्य हे आता तुम्हीच सांगा.

हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका… विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता? प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? तसेच, ३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? . बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे, आणि ते जवळजवळ ८०% पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे! मेट्रो ३ च्या लाईनसाठी कांजूरमार्ग आहे. आरे कारशेडसाठी आपण किती जागा घेतली होती, साधरणत: ३० हेक्टर जागा आपण घेतली होती. ५ हेक्टरमध्ये घटदाट झाडी असल्याने ती जागा वापरणार नसल्याचं आपण आज लेखी दिलंय. आता, ती जागा वापरणार नाही तर मग या प्रकल्पात घेतली कशाला?