WhatsApp युजर्ससाठी गुड न्यूज ! येतंय ‘हे’ भन्नाट फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात WhatsApp चा वापर वाढला आहे. त्यानुसार, आपल्या युजर्सला अनेक नवनवे फिचर्स उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा नेहमी प्रयत्न असतो. आत्तापर्यंत अनेक असे फिचर्स आले आहेत. त्यानंतर आता कंपनीकडून आणखी एक नवे फिचर आणले जात आहे.

WhatsApp युजर्ससाठी ही एक ‘गुड न्यूज’ असणार आहे. लवकरच WhatsApp आता आणखी कलरफूल होणार आहे. युजर्सना अ‍ॅपमधील रंग बदलता येणार असल्याची माहिती दिली जात आहे. WaBetaInfo या वेबसाईटने ट्विट करून ही माहिती दिली आहे. WhatsApp एका अशा फीचर्सवर काम करत आहे, जे युजर्सना अ‍ॅपमधील काही रंग बदलण्याची सुविधा देणार आहे. या फीचरवर सध्या काम चालू असून, अधिकची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp वर अनेकदा मेसेज टाईप करायला पुरेसा वेळ नसतो अथवा कंटाळा येतो. मात्र, आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण आता टाईप न करताही खास मेसेज पाठवता येणार आहे.

असे असतील बदल…
– नव्या फीचरचा वापर करून युजर्स चॅटबॉक्समधील काही रंग बदलू शकतील. युजर्सना स्क्रीनवरील मजकूरासाठी डार्क ग्रीन किंवा लाईट ग्रीन कलरची पण निवड करता येईल.

– WhatsApp च्या या नव्या फीचरमध्ये ग्रीन कलरच्या अनेक शेड्स मिळणार आहे. या फीचरमुळे युजर्सना चॅट करतानाही मजा येणार आहे.

– WhatsApp ने युजर्ससाठी WhatsApp Mute Video फीचरला अखेर कंपनीने लाँच केले आहे. यापूर्वी WhatsApp चे हे फीचर टेस्टिंगसाठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध होते.