लैंगिक संबंधात तुमच्या जोडीदारा सोबत या विषयावर बोललेच पाहिजे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नर आणि मादी निसर्गाने प्रत्येक प्राण्यात निर्माण केलेली दोन पात्र दोघांच्या मिलनातच त्या प्राणी जातीचे भविष्य आणि भवितव्य टिकून असते. माणूस सुद्धा एक प्राणीच आहे त्यामुळे हा  गुणधर्म माणसालाही लागू होतोच होतो. आपण जर रिलेशन शीप मध्ये असाल अथवा आपण लव्ह इन मध्ये असाल अथवा आपले लग्न झालेले असेल तरी आपण आपल्या जोडीदाराशी संभोगाच्या संदर्भात काही गोष्टींवर मोकळेपणाने बोलणे गरजेचे असते.

सुरक्षितता ठेवणे 
जरी तुमचे लग्न झालेले असेल तरी तुम्ही सुरक्षिततेच्या मुद्द्यावर हलगर्जीपणा बाळगू नका कारण जोडीदाराने विवाह बाह्य संबंधात सुरक्षितता नबाळगल्याने दुर्दर आजार नवरा बायकोला जडल्याचे अनेक प्रसंग आपणाला समाजात दिसतात म्हणून सुरक्षितता नात्याचा पाय आणि आयुष्य दोन्ही मजबूत करते. म्हणून सुरक्षितता बाळगून आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सुरक्षितेच्या बाबतीत दोघांनी आपसात मोकळी चर्चा करणे देखील तितकंच महत्वाचे आहे.

लैंगिक नात्यात सहजता आणा 
लैंगिक संबंधांत नात्यात सहजता आणणे अत्यंत आवश्यक आहे. नात्यात सहजता असेल तरच जोडीदाराचे आणि तुमचे नात्याचे बंध अतूट होतात. संभोगात एकाद्या जोडीदाराला आवडणारी गोष्ट त्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीला आवडेलच असे नाही. यामुळे दोघांचे एक मत होईल अशाच क्रिया आपण करत जा जेणेकरून आपले नाते अधिक घट्ट होईल.

बेधडक नकार द्या
एकादी गोष्ट तुम्हाला जर किळसवाणी वाटत असेल अथवा तुमच्या मनात काहूर माजवणारी असेल तर अशी गोष्ट करण्यास तुम्ही बेधडकपणे नाही म्हणा कारण संभोग हा शारीरिक सुखासाठी असतो या उलट मनावर अथवा शरीरावर इजा करण्यासाठी नसतो. त्यामुळे दोघांपैकी एकाला त्रास होईल असा संभोग करणे कदापि योग्य नाही कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळणार नाही उलट त्यातून तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागेल.

संभोग हि मानवी जीवनाची सर्वोच्च आनंद देणारी स्थिती आहे त्यामुळे त्या गोष्टीचा स्त्री आणि पुरुषांनी चांगला आनंद घ्यावा. संभोगात काही अडचणी येत असतील तर त्या एकमेकांना बोला आणि त्या सोडवून घ्या. तुमच्या  संभोगात दोघात चर्चेतून अडचणी सुटत नसतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवटी तुमचे वैवाहिक जीवन सुखी असेल तर तुमचे आयुष्य सुखकर बनते अन्यथा तणाव चिडचिड या मानसिक विकारांचा सामना करावा लागतो.