दिवसातील 2 कप चहा अनेक आजारांना ठेवतो दूर, ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुम्ही लोकांना नेहमी चहाचे वाईट परिणाम सांगतानाच ऐकले असेल, काही डॉक्टरसुद्धा रूग्णांना चहा पिणे बंद करण्यास सांगतात. कारण त्या व्यक्तीला एक कपसुद्धा चहा नुकसानकारक ठरणारा असतो. मात्र, एखाद्या निरोगी व्यक्तीसाठी चहा किती जरूरी आहे, हे तुम्हाला महिती नसावे. जाणून घेवूयात, शरीरासाठी चहा पिणे किती लाभदायक आहे.

हे आहेत फायदे
1. महिलांमध्ये कमी होतो कॅन्सरचा धोका
संशोधकांनी म्हटले आहे की, दररोज 2 कप चहा प्यायल्याने महिलांमध्ये ओवेरियन कॅन्सरचा धोका खुप कमी होतो. याशिवाय चहा प्यायल्याने स्ट्रेस लेव्हलसुद्धा कमी होते. विेशेषकरून ज्या महिला घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळतात, त्यांच्यासाठी दिवसात 2 कप चहा पिणे आवश्यक आहे.

2 केवळ चहा, कॉफी नाही
काही महिला चहाऐवजी कॉफी पिणे पसंत करतात, परंतु एक 1 कप कॉफीमध्ये 150 मि.ग्रॅम कॅफीन आढळते, तर चहाच्या 1 कपात केवळ 30-40 टक्के कॅफीन असते. कॉफीचे जास्त सेवन केल्यास छातीत जळजळ होऊ शकते, यामुळे कॉफीपेक्षा चहा पिणे कधीही चांगले.

3 हाडे मजबूत होतात
दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, परंतु नुकतेच अमेरिकेत एक संशोधन करण्यात आले, यामध्ये म्हटले आहे की, जे लोक केवळ दूध पितात, चहा पित नाहीत, त्यांची हाडे चहा पिणार्‍यांच्या तुलनते कमजोर असतात. मजबूत हाडांसाठी चहा आणि दूध दोन्हीचे सेवन करणे आवश्यक आहे.

4 दात चमकू लागतात
चहात फ्लोराईड आणि टॅनिन असते, जर तुम्ही दिवसात 2 वेळा कमी साखरेचा चहा प्यायला तर तुमचे दात चमकू लागतात. होय, चहामधील ही दोन्ही तत्व दात चमकवणे आणि ते मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतात.

5 स्ट्राँग मेटाबॉलिज्म
जर तुमचे वजन कमी होत नसेल तर आजपासूनच साखर न टाकलेला चहा किंवा गुळाचा चहा प्यायला सुरूवात करा. यामुळे मेटाबॉलिज्म अ‍ॅक्टिव होते, आणि शरीरातील फॅट कमी होते. तुम्ही जे काही खाता ते योग्यवेळी पचवण्यात चहा मदत करतो.

6 रोगांशी लढण्यासाठी उपयोगी
जे लोक रोज 2 कप चहा पितात, ते अन्य लोकांच्या तुलनेत कमी आजारी पडतात. चहा तुमच्या शरीराला रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनवते. चहा पिणार्‍यांना सर्दी, ताप, खोकला जास्त होत नाही.

7 मुलांना जरूर द्या एक कप चहा
मुलांनी दूध प्यायलाच पाहिजे, पण केवळ दूध न देता त्यांना पचनतंत्र मजबत होण्यासाठी कमी साखरेचा चहा एक कप चहा द्या. यामळे इम्यूनिटी मजबूत होते.