Food Avoid During Covid-19 Recovery : कोरोनावर लवकर मात द्यायची असल्यास आहारात समाविष्ट करू नका ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्त संस्था : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण कोरोनातून बरे होण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. असे केल्याने संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडेही विशेष लक्षण देणे गरजेचे आहे.

कोल्ड ड्रिंक टाळावे

कोरोनाबाधित रुग्णाने कोल्ड ड्रिंक्स किंवा कोणत्याही थंडगार पेयाचा वापर करू नये. थंड पेय घेतल्याने गळ्यात सूज येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कफ आणि सर्दीतून बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो.

तळलेले पदार्थही ठरू शकतात घातक

कोरोनाबाधिताने तळलेले पदार्थ टाळावेत. त्याचे सेवन केल्यास आरोग्यावर याचा दुष्परिणाम जाणवू शकतो. तळलेल्या पदार्थ रोगप्रतिकारकशक्ती कमजोर करू शकते. त्यामुळे इतर कोणत्याही आजाराशी सामना करण्यासाठी क्षमता कमी होते. या तळलेल्या पदार्थांच्या सेवनाने ह्रदयरोगाचा धोका वाढू शकतो.

तिखट पदार्थ टाळावेत

कोरोनाबाधित रुग्णाने मसालेदार आहार टाळावा. मसालेदार जेवण गळ्यात जळजळ निर्माण करू शकते. त्यामुळे तुम्हाला खोकल्याची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला मिर्च खाण्यास आवडत असेल तर तुम्ही लाल मिर्चऐवजी काली मिर्चचे सेवन करावे.

प्रोसेस्ड फूडही टाळा

कोरोनाबाधित रुग्णांनी प्रोसेस्ड फूड खाणे टाळावे. याचे सेवन केल्याने तुम्हाला याचा धोका उद्भवू शकतो. डबेबंद प्रोसेस्ड फूडमध्ये सोडियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रुग्णाला बरे होताना काही अडचणी येऊ शकतात.

मद्यपान टाळावे

जर तुम्ही कोरोनातून बरे होत असाल तर तुम्ही चुकूनही दारूचे सेवन करू नये. दारू प्यायल्याने औषधे परिणाम करत नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकर बरे होण्याचा रिकव्हरी रेट कमी होऊ शकतो. तुम्हाला लवकर बरे व्हायचे असेल तर ताक आणि लिंबू पाणी यांचे सेवन करावे.