अधिक फायद्यासाठी कोणता फेसमास्क आठवड्यातून आणि महिन्यातून किती वेळा लावावा ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   चेहरा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे फेस मास्क लावत असता. परंतु कोणता फेस मास्क कधी आणि किती वेळा किंवा किती अंतरानं आणि का लावावा याबद्दल अनेकांना शंका आहे. आज याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) चारकोल फेस मास्क – हा मास्क खूप हार्श आणि केमिकलयुक्त असतो. हा मास्क स्कीनमधून बॅक्टेरिया, टॉक्सिन्स, घाण, तेल आणि दूषित कण दूर करतो परंतु चेहऱ्यावर खूप खोलवर प्रभाव टाकतो. याचा वापर महिन्यातून एकदाच करायला हवा.

2) जेलाटीन फेस मास्क – त्वचा कोमेजल्यावर किंवा डेड स्कीन सेल्स वाढल्यानंतर याचा वापर केला जातो. यानं स्कीनला इजा होणयाची शक्यता असते. त्यामुळं याचा वापर जास्तीत जास्त किंवा फार लवकर करू नये. एक्सपर्ट सांगतात की, महिन्यातून 2 वेळा याचा वापर केला जाऊ शकतो.

3) कोरियन शीट फेस मास्क – आज काल असे मास्क खूप आले आहेत. याचा ट्रेंडही वाढला आहे. चेहऱ्यावर लावल्यानंतर 20 मिनिचांनी आपोआप भिजून हा मास्क निघू लागतो. हा मास्क आठड्यातून एकदा आणि महिन्यातून 3 वेळा लावावा.

4) क्ले फेस मास्क – हा मास्क नैसर्गिक आहे असं समजून याचा वापर जास्त केला जातो. परंतु यातही केमिकल असतं. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.

5) घरी तयार केलेले फेस मास्क – नैसर्गिक किंवा घरगुती वस्तूंपासून तयार केलेले फेस मास्क कायमच सकारात्मक परिणाम करतात(योग्य वस्तू योग्य प्रमाणात असतील तरच). कारण यात कमेकिल नसतात. यामुळं त्वचेचं नुकसान होत नाही. तरीही तुम्ही याचा वापर आठड्यातून 3 वेळा करू शकता.