‘सुरूवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार’, संजय राऊतांचे आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकासआघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाही. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे मात्र अशा कारवाई करून पुढची पंचवीस वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांचावर ईडीने केलेल्या केलेल्या कारवाईबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने कारवाई केली. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकासआघाडीचे सरकार मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. परंतु, या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी आठ साडे आठ च्या दरम्यान ईडी तीन पथके तसेच तपासासाठी पोहोचली त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन पुत्र आणि त्या कार्यालयात तपास सुरू केला आणि नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास आहे करत आहे याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांना देखील तिकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत त्यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे याचा तपशील आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरी देखील ईडी पथक दाखल झाला आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही अधिकारी पोहोचले.

या प्रकरणावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे भाष्य
मनी लॉन्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहे. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफियाराज असल्याचा आरोप केला केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागीदारीतून प्रचंड पैसा येत असतो.