तुम्ही डिप्रेशनचे बळी असाल तर खा ही ‘भाजी’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या रासायनिक खतांच्या वापरामुळे मानवी आरोग्य हे धोक्यात आले आहे. कोणाला कधी कोणता आजरा होईल ते सांगता येत नाही. अगदी २०ते २५ वर्ष वयोगटातील तरुणांना बीपी, शुगर, डिप्रेशन यासारख्या अनेक आजारांनी ग्रासलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य झालं आहे. त्यामुळं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्याला अनेक जण वेगवेगळ्या भाज्या, फळे, पदार्थ खाण्याचा सल्ला देत असतात.

जेणेकरून गोळ्या-औषध घेण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्हाला जर गोळ्या औषध घ्यायची नसतील आणि तुम्ही जर डिप्रेशन या आजाराचे बळी असाल तर मशरूम नक्की खा. कारण मशरूमचे अनेक फायदे आहेत. मशरूमचे फायदे खालील प्रमाणे :

१) मशरूममध्ये आजारांशी लढण्याची ताकद असते. त्यामुळे मशरूम आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.

२) ज्या लोक उदासीनतेने ग्रस्त आहेत त्या लोकांसाठीही मशरूम खूप फायदेकारक ठरते.

३) मशरूममध्ये विटामिन डी देखील असते. हे विटामिन हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.

४) मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहाइड्रेट्स असतात. ज्यामुळे वजन आणि ब्लड शूगर वाढत नाही.

५) मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही.

६) नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरुमचे सेवन केले पाहिजे.

७) मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात. कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो.

अशा प्रकारे डिप्रेशन संबंधित अनेक आजारांवर मशरूम गुमकारी आहे. ब्रिटनच्या इंपीरियल कॉलेजमधील संशोधकांनी उदासीनतेने ग्रस्त असलेल्या काही रुग्णांना उपचार करण्यासाठी सिलिसिबिनचा वापर केला. यामधील काही रुग्ण तर खूप नैराश्येत होते. या रुग्णांनाच नंतर सर्वे केला तर त्यात ज्यांनी सिलिसिबिन घेतलं आहे. त्यांच्यात आजारपणाचे लक्षण कमी होते. त्यामुळे या संशोधनअहवालानुसार मशरूम खाल्याने अनेक फायदे होतात. आणि डीप्रेशनची समस्या दूर होते.

आरोग्यविषयक वृत्त –

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like