International Woman’s Day 2020 : तुम्ही देखील बनू शकता एक दिवसाच्या ‘कलेक्टर’, राज्यातील ‘या’ जिल्ह्यात संधी

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन – महिला दिनापूर्वी एक अनोखा उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक दिवसासाठी कलेक्टर’ म्हणून काम करण्याची संधी दिली जात आहे. बुलढाणाच्या कलेक्टर सुमन चंद्रा यांनी या उपक्रमाबाबत बुधवार म्हटले की, हा उपक्रम मुलींमध्ये प्रशासनाची कार्यप्रणाली, सामाजिक आणि अन्य मुद्यांबाबत जागरूकता निर्माण करेल.

कलेक्टर चंद्रा म्हणाल्या की, या उपक्रमांतर्गत, जिल्हा परिषद शाळांमधील उत्कृष्ट आणि हुशार विद्यार्थीनींना शासनाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी एक दिवसासाठी कलेक्टर बनण्याची आणि त्यांच्या खुर्चीवर बसण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी म्हटले की, यामुळे, मुलींना निर्णय घेण्याची संधी मिळाली, तर त्या समाजात कोणता बदल करू शकतात, हे समजणार आहे.

मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचा उद्देश
कलेक्टर म्हणाल्या, मुलींमध्ये त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासोबतच आजूबाजूच्या मुलींना चांगले कार्य करण्यासाठी आणि समाजातील पुरणमतवाद संपवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे. आज, मलकापुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनी मारिया आली आणि ती या उपक्रमात सहभागी झाली. ती जनगणनेबाबात एका बैठकीत सहभागी होईल आणि जाणून घेईल की जणगणना कशी होते. ती जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमाची देखरेख करणार आहे. यामुळे त्यांच्यात शासन आणि प्रशासनाबाबत समज निर्माण होईल.

आठवीच्या विद्यार्थीनीला मिळाली संधी
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी, पडोली जिल्हा परिषद शाळेतील आठवीतील एक हुशार विद्यार्थीनी पूनम देशमुखने कलेक्टर म्हणून कामकाज केले. तसेच प्रशासकीय कामांची देखरेख केली. तिने मीडियाशी चर्चा केली, लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला तसेच जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा आढावा घेतला.