‘तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की….,’ धनंजय मुंडेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे अडचणीत आले असतानाच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या पाठिमागे उभारण्याची भूमिका घेतली आहे. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर इतरांनी देखील रेणू शर्मावर आरोप केल्याने मुंडे यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्माने आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपली बाजू मांडली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर ते अडचणीत येतील असे वाटत होते. मात्र, त्याचवेळी या प्रकरणाला वेगळे वळण लागले. भाजप नेत्याच्या एन्ट्रीनंतर धनंजय मुंडे यांना काहीसा दिलासा मिळला. रेणू शर्मावर हनिट्रॅपचा आरोप होत असून तिच्या विरोधात काही जणांनी तक्रार केली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी देखील या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुंडेबाबत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मांडली.

धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मागील काही दिवसांपासून ते चर्चेत आले आहेत. त्यातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंडे यांनी शायरीच्या मध्यमातून लोकांना साद घातली होती. मुंडे म्हणाले, ‘तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की, मै जब जब बिखरा हुं दुगनी रफ्तार से निखरा हुं’