मत मोदींना मग माझ्याकडून कामाची अपेक्षा का ? ; ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केला सवाल

रायचूर : वृत्तसंस्था – लोकसभेत मोदी सरकार अधिक बळाने पुन्हा सत्तेत विराजमन झाले आहे. त्यांच्या विजयामुळे अनेक पक्षांना धक्का मिळाला आहे. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेत भाजपला विजय मिळवता आला नाही. पण केंद्रात भाजपची सत्ता आल्याने की काय कर्नाटकमधील सत्ताधाऱ्यांना ते पचले नाही असच दिसत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या लोकांचा आपमान केला आहे.

तुम्ही नरेंद्र मोदींना मते दिली आणि आता तुमचे काम मी करावे अशी इच्छा आहे. तुमची अशी अपेक्षा आहे का की मी तुमचा आदर करावा? अशा शब्दात एच.डी.कुमारस्वामी यांनी त्यांचा अपमान केला आहे. कुमारस्वामी रायचूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी आग पाखड केली.

येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. कुमारस्वामींना भेटता यावे म्हणून त्यांनी रास्ता रोको केला. आणि याच रास्ता रोकोमुळे मुख्यमंत्री भडकले. तेव्हा रागात ‘मोदींना मतदान केले आणि माझ्याकडून काम करून घेताय अशा शब्दात त्यांना सुनावले. मी तुमचा आदर का करू, तुम्ही निघा येथून नाही तर मला लाठीचार्ज करावा लागेल’, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांना तेथून हाकलून लावले.

दरम्यान, कुमारस्वामींनी आपल्या वगणूकीवर स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मी १५ दिवसांचा वेळ मागितला होता. पण त्यांनी रास्ता रोको केला, या कारणामुळे अधिक राग आल्याचे त्यांनी सांगितलं. जर पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला तर ते मान्य असेल का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्यातील सरकार सहिष्णु आहे पण असक्षम नाही, असंही त्यांनी यावेळी नमुद केले.

आरोग्यविषयक वृत्त –

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन