Health Tips : एक ग्लास कारल्याचा रस पिल्यानं होणारे फायदे ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – वजन (Weight) जास्त असलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बाहेरचे खाणे, व्यायामाकडे लक्ष न देणे हे वाढत्या वजना(Weight)चे मुख्य कारण असू शकते. कारल्याचा रस (gourd juice) आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, कारल्याच्या रसा (gourd juice)चे इतरही बरेच फायदे आहेत.

शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी, कारल्याचा रस उपयोगी मानला जातो. त्याच बरोबर वजन कमी करणे आणि त्यावर नियंत्रण राखणे यासाठी देखील ते फायदेशीर आहे.

चला तर जाणून घेऊ कारल्याचा रस पिण्याचे फायदे

कर्करोगावर नियंत्रण ठेवते

एका अहवालानुसार, कारल्याचा रस कर्करोगाच्या पेशींची क्षमता मर्यादित करतो आणि त्यामुळे पेशींचा उर्जा स्त्रोत कमी होतो आणि पेशींना मारतो. आणखी एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कारल्याच्या रसाने स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो.

दम्याचा उपचार करण्यास मदत करते

कारल्याचा रस नियमितपणे पिल्याने तीव्र खोकला दूर होतो. दमा आणि फुफ्फुसांच्या संसर्गाच्या उपचारांवर कारल्याचा रस हा एक प्रभावी उपाय आहे.

त्वचेवर चमक येते

कारले शरीरातले रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे त्वचेवर असलेल्या सुरकुत्या देखील कमी करण्यास मदत करू शकते. अशा प्रकारे, कारल्याचा रस त्वचा चमकदार बनवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.