घरात ठेवलेले सोने विकल्यास द्यावा लागेल टॅक्स, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : आता घरातील सोने विकणे सुद्धा सोपे राहिलेले नाही. कारण मोदी सरकारने याबाबतचे नियम बदलले आहेत. प्राप्तीकर विभागाच्या नियमानुसार तुम्ही सोने विकता तेव्हा तुम्हाला मिळणार्‍या पैशावर नियमानुसार टॅक्स भरावा लागेल. सोने विकायचे असल्यास त्यावर किती टॅक्स द्यावा लागतो ते जाणून घेवूयात…

देशात सामान्य लोक सोन्यात गुंतवणुक 4 पद्धतीने करतात, ज्यामध्ये फिजिकल गोल्ड, गोल्ड म्यूचुअल फंड किंवा ईटीएफ, डिजिटल गोल्ड आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड या पद्धतींचा समावेश आहे. या पद्धतीने गुंतवणुक केल्यानंतर मिळणार्‍या लाभावर कशा प्रकारे टॅक्स द्यावा लागतो, ते जाणून घेवूयात.

फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणुकीच्या लाभावर टॅक्स
सोन्यात गुंतवणुकीची सर्वात सोपी पद्धत आहेत ज्वेलरी किंवा नाणे खरेदी करणे आणि बहुतांश लोक सोन्यात अशाप्रकारेच गुंतवणुक करतात. जर अशा प्रकारे गुंतवणूक केलेले सोने विकले तर दोन प्रकारे टॅक्स द्यावे लागतो. पहिल्यात जर तुम्ही सोने खरेदीची तारखेच्या आत ते विकले आणि यावर जर तुम्हाला नफा होत असेल तर यास शॉर्ट टर्म गेन मानले जाईल. इन्कम टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला नफ्याला तुमचे इन्कम मानले जाईल आणि त्यावर टॅक्स द्यावा लागेल. तर दुसरीकडे जर तुम्ही गुंतवणुक तारखेच्या तीन वर्षानंतर ते सोने विकत असाल तर यास लाँग टर्म कॅपिटल मानले जाऊन यावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागेल.

गोल्ड म्यूच्युअल फंड्स, गोल्ड ईटीएफमधील लाभावर टॅक्स
गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्यूच्युअल फंड्सवर फिजिकल गोल्डप्रमाणेच टॅक्स द्यावा लागतो.

डिजिटल गोल्डवर टॅक्सवर
अशाप्रकारे केलेल्या गुंतवणुकीत कॅपिटल गेनवर फिजिकल गोल्ड किंवा गोल्ड म्यूच्युअल फंड्स किंवा गोल्ड ईटीएफप्रमाणेच टॅक्स द्यावा लागतो.

सॉवरेन गोल्ड बाँड्सवर टॅक्स –
यांचा मॅच्युरिटी पीरियड आठ वर्षांचा असतो आणि या कालावधीवर रिडीम झाल्यानंतर यातून झालेल्या नफ्यावर कोणताही टॅक्स लागत नाही.

मात्र, जर यास मॅच्युरिटीच्या अगोदर (गुंतवणुकीच्या पाच वर्षानंतरच एग्झिट ऑपशन प्लून मिळतो) यास रिडीम केल्यास यावर फिजिकल गोल्ड किंवा गोल्ड म्यूच्युअल फंड्स किंवा गोल्ड ईटीएफच्या प्रमाणे टॅक्स द्यावा लागतो. याशिवाय 2.5 टक्केचे वार्षिक व्याज सुद्धा मिळते, जे तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार असते. मात्र, टीडीएस कापला जात नाही.