Alzheimer : वृध्दापकाळात विसरणार नाहीत कोणतीही गोष्ट जर दररोज कराल ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – विस्मरण (अल्जाइमर) या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी २१ सप्टेंबर हा जागतिक विस्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. काही वर्षापूर्वी विस्मरण (अल्जाइमर) हा आजार साधारणतः ७० वर्षाच्या व्यक्तींना होत असे, पण आता चाळीशीतील तरूणही या आजारामुळे त्रस्त झाले आहेत. विसरणे हा आजार नसल्याचं अनेक जण मानतात, पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. कधी तरी विसरणे हे आपण समजू शकतो, पण रोज-रोज विसरणं हे गंभीर आजाराचं लक्षणं समजलं जातं. यालाच वैद्यकीय भाषेत विस्मरण (अल्जाइमर) असं म्हणतात. पण या आजाराला घाबरू नका. काही टिप्स आपण नियमित केल्या तर या आजारापासून आपण दूर राहू शकतात.

काय आहे विस्मरण आजार (अल्जाइमर)
विस्मरण (अल्जाइमर) हा मेंदुशी निगडीत असा आजार आहे, यात एखादी गोष्ट, घटना लक्षात राहण्याची क्षमता कमी कमी होत जाते. अशा व्यक्तींची समज पण कमी होऊन जाते. त्याला भ्रम होत असतात. मेदुंच्या एका विशिष्ठ भागात एमलॉयड बीटा प्रोटीन जमा झाल्यानं हा आजार होतो. त्यानंतर या आजारावर उपचार करणं कठिण जाते. आजाराच्या सुरवातीलाच नियमित तपासण्या आणि उपचार केल्यास या आजारांवर नियत्रंण मिळविता येते.

विस्मरण (अल्जाइमर)ची लक्षणे

१) लहान-लहान वस्तू विसरणे
२) विचार करणे आणि समजणे कठिण होणे
३) लघवी नीट न होणे
४) वजन कमी होणे
५) चक्कर येणं
६) त्वचेमध्ये संसर्ग होणे
७) घुरगुरणे, आळस देणे
८) लोकांना न ओळखणे
९) बोलण्यात अडथळा निर्माण होणे

विस्मरण (अल्जाइमर)वर उपाय
१)अभ्यास, खेळ, क्रासवर्ड आणि मेंदुच्या शक्तीचा उपयोग होईल अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा.
२) स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रोज बादाम आणि अन्य डायफ्रुट खाणे. पिंपळाच्या सालीची पावडर आणि हळद यांचे सेवन केल्यानं स्मरणशक्ती वाढ होणयास मदत होते.
३)रोजच्या आहारात पाल्याभाज्या, फळे, मासे यांचा समावेश करा.
४) दररोज व्यायाम आणि योगा केल्यानं विस्मरणावर नियंत्रण मिळविता येते
५) सर्वांगासन, भुजंगासन, कपालभाति आदी प्राणायाम करा
६) दररोज सकाळी फिरायला जाणे.
७)वाढत्या वयात विस्मरण टाळण्यासाठी स्वतःची कामे स्वतःच करा. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
८) अरोमा थेरपी करा, त्यामुळं तुम्ही तणावमुक्त राहणार.