अगोदर मुलगी अन् आता मुलानं केली आत्महत्या, निधनाची बातमी समजताच आईनं केलं विष प्राशन…

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ओंकार दीपक ढोबळे (वय-21) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूची वर्ता समजताच आईने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ओंकारच्या आईला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी मुलगी गेली आता मुलगा गेल्याने ढोबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दीपक ढोबळे हे पश्चिम आदिवासी भागात असलेल्या माणिकडोह गावात शेती करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीचे अकस्मिक निधन झाले. त्यामुळे ढोबळे कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मुलीच्या मृत्यूच्या दु:खातून ढोबळे कुटुंब सावरत होत. त्यातच कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊनमध्ये त्यांच्या शेतमालाचे बाजार पेठ बंद असल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे ढोबळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. यातच दीपकने मानसिक तणावातून नैराश्य आल्याने त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं.

तरुण मुलानं आत्महत्या केल्याचे समजल्यावर ढोबळे यांनी शेताकडे धाव घेतली. त्यावेळी त्याची पत्नी ही एकटीच घरी होती. मुलाच्या आत्महत्येची बातमी समजताच त्यांनी दोन मुलांना गमावल्याच्या दु:खातून शेतात फवरणीसाठी आणलेले औषध प्राशन केले. त्यांना तातडीने जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून वडील मात्र मुलाचा मृतदेह बाजूला ठेऊन पत्नीला वाचवण्यासाठी धवपळ करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like