जेष्ठ महिलेला ‘अश्लिल’ फोटो पाठवून शरीरसंबंधाची मागणी करत तरुणाने घातला कार्यालयामध्ये ‘तमाशा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम कोणी कोणावरही करावे. त्यात वयाची आडकाठी असता कामा नये, असे म्हटले जाते. पण आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व वयाची साठी गाठलेल्या महिलेला अश्लिल फोटो पाठवून तिच्याशी शरीरसंबंधाची मागणी करुन कार्यालयामध्ये तमाशा करणाऱ्या तरुणाविरुद्ध भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संतोष भाऊसाहेब बोऱ्हाडे (रा. भोलेनाथ स्टोअर्स, डायस प्लॉट, पुणे) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ६० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ नोव्हेंबर २०१७ ते २० जून २०१९ दरम्यान सुरु होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, संतोष बोऱ्हाडे याची पत्नी फिर्यादी महिलेच्या कासारवाडी येथील कंपनीत साफसफाईचे काम करीत असे. त्यातून त्याची या महिलेशी ओळख झाली होती. त्याने या महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने वारंवार त्यांच्या मोबाईलवर अश्लिल मजकूर, अश्लिल फोटो पाठवून शरीरसुखाची मागणी केली.

त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा २० जून रोजी सायंकाळी संतोष बोऱ्हाडे हा थेट त्यांच्या कार्यालयामध्ये गेला. त्याने या महिलेला धमकाविले. त्याचा आवाज ऐकून कार्यालयामधील लोक जमले. तेव्हा त्याने कोणी मध्ये आल्यास अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धमकी दिली. या महिलेच्या फिर्यादीनुसार भोसरी पोलिसांनी संतोष बोऱ्हाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स 

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु 

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ