मोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो; 26 वर्षीय युवकाला फाशीची शिक्षा

रियाद : पोलीसनामा ऑनलाइन – Saudi Arabia|मोबाइलमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचा फोटो ठेवल्याने सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारने एका 26 वर्षीय तरुणाला फाशीची (Execution) शिक्षा ठोठावली आहे. या तरुणाने 2011 आणि 2012 मध्ये सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. सौदी सरकारने तरुणाकडे आढळलेले फोटो आक्रमक (Offensive Photo Was Found On His Phone) असल्याचे म्हटले. मुस्तफा अल-दरविश असे फाशी ठोठावलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान सौदी अरेबिया सरकारने यापूर्वी कोणत्याही बंडखोरांना फाशीची शिक्षा दिली जाणार नसल्याचे म्हटले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

मुस्तफा 17 वर्षांचा असताना पूर्व प्रांतात वर्ष 2011 आणि 2012 मध्ये झालेल्या शिया मुस्लिमांच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता.
त्यानंतर त्याला 2015 मध्ये अनेक गुन्ह्यांच्या कलमाखाली अटक झाली होती.
वयाच्या 20 व्या वर्षी मुस्तफाची तुरुंगातून सुटका झाली.
त्यावेळी पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केल्याचे कुटुंबीयानी सांगितले. याच मोबाइलमध्ये पोलिसांना आंदोलनाचा एक आक्षेपार्ह फोटो आढळला होता.मुस्तफाला तुरुंगात वेगळे ठेवले जात होते.

अनेकदा चौकशी दरम्यान तो बेशुद्ध पडल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. अखेर कसून चौकशीनंतर मुस्तफाने आपला गुन्हा मान्य केला. मात्र, कोर्टात मुस्तफाने आपला गुन्हा अमान्य करताना पोलिसांच्या मारहाणीतून वाचण्यासाठी गुन्हा कबूल केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मुस्तफा 6 वर्ष तुरुंगात होता.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : young boy executed by saudi arabia after offensive photo was found on his phone

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला होता पण..

bjp gaurav bhatia |भाजप नेत्याचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाले – काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज

Maratha Reservation | हसन मुश्रीफांची गर्जना, म्हणाले- ‘सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, आघाडी सरकारची ‘ती’ चूक मान्य’

Wagle Estate | ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू