Mumbai : मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला ‘जीव’ !

पोलिसनामा ऑनलाईन – सांताक्रूझ येथे एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले. मोबाईल चोरीच्या आरोपावरून सांताक्रूझ पश्चिमेकडील मुक्तानंद पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सांताक्रूझ येथील पालिकेचे हे मैदान गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. येथे आलेल्या सैजाद खान (३०) नावाच्या तरुणाला तिथला मुकादम आणि कामगारांनी लोखंडी खांबाला बांधलं. त्यानंतर काठी आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर सैजाद विव्हळत जवळील रिक्षात जाऊन झोपला. दरम्यान, भाभा रुग्णालयात त्याला दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुक्तानंद पार्कमध्ये ही घटना घडली. सैजाद खान या तरुणाला लोखंडी खांबाला बांधून काठी आणि लाथानुकक्यानी मारहाण करण्यात आली. बेदम मारहाणीत सैजाद खान याचा मृत्यू झाला. सांताक्रूझ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हयाची नोंद केली. आणि सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल चोरीमुळे तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे. २५ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. सैजाद भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली.