नापिकीस कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – मागील एका वर्षा पुर्वी कल्याण गिराम यांचा विवाह १२ मे रोजी झाला होता. आजच त्याने आत्महत्या केल्याने मिञ परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बाभळगांव ( पेठ ) येथील अल्पभुधारक शेतकरी कल्याण मारुती गिराम (२४) या तरुण शेतकऱ्याने शेतातील सततच्या नापिकीस कंटाळून (ता.१२मे) रविवारी पहाटे राहत्या घरी छताच्या कडीस गळफास लावून आत्महत्या केली.

याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

बाभळगांव ( पेठ ) येथील तरुण शेतकरी असलेल्या कल्याण मारुती गिराम याच्या नावे साडेतीन एकर जमीन असल्याचे कळते माञ त्यातून मागील दोन वर्षांत खर्चा पुरते ही उत्पन्न झाले नसल्याने खर्च भागवणे सुद्धा कल्याण यांना मुश्कील झाले होते

शेती मध्ये केलेला खर्च सुद्धा निघाला नाही एका महिन्याच्या तोंडावर खरीपाची पेरणी आली असल्याने ते मागील काही दिवसा पासुन पासून विवंचनेत होते. रविवार १२ मे रोजी पहाटे छताच्या कडीस गळफास लावून आत्महत्या केली आहे,

पाथरी पोलीसात भागवत गिराम यांनी आत्महत्येच्या घटनेची माहिती दिल्याने याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बर्गे हे करीत आहे

कल्याण गिराम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी आहे