लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर २ वर्षे अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर सतत २ वर्षे लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मुन्ना राम सिंग (वय ३४, रा़ पावर हाऊस, फेज २, हिंजवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ३३ वर्षांच्या तरुणीने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार जानेवारी २०१७ पासून ते फेब्रुवारी २०१९ पर्यत सुरु होता. ही तरुणी आणि मुन्ना सिंग हे दोघेही एकमेकांना ओळख असून हिंजवडीतील कंपनीमध्ये कामाला आहेत. सिंग याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले.

त्यातून तिच्याकडे जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केले. तिने दरवेळी लग्नाविषयी विचारल्यावर नंतर करु असे सांगून तो टाळाटाळ करीत असे. त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर या तरुणीने आपली फसवणूक करुन अत्याचार केल्याची फिर्याद दिली आहे.