६० वर्षाच्या वृद्धाने केला विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मोशी परिसरात एका साठ वर्षीय वृद्धाने २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर नारायण पोखरकर (६०, रा. साने चौक, चिखली) याला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास मोशी परिसरात घडला. पोखरकर याने पीडित महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

चाकण मध्ये एका ३० वर्षीय महिलेचा भाग्यदीप रावसाहेब जायभावे (३४, रा. अमरावती) याने विनयभंग केला. भाग्यदीप याने पीडित महिलेस मेसेज पाठवून तसेच कंपनी पासून तिच्या घरापर्यंत पाठलाग करून विनयभंग केला. तपास चाकण पोलीस करत आहेत.