संतापजनक ! युवतीवर तिच्याच बॉयफ्रेन्ड अन् मित्रांनीच केला बलात्कार, ‘बेशुध्द’ झाल्यानंतर तिथंच दिलं सोडून

महाराजगंज : वृत्तसंस्था – महाराजगंज येथील सिसवा रेल्वे स्थानकावर एका तरुणीचा बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही तरुणी रेल्वेची वाट पाहत होती. ही घटना २० फेब्रुवारीला घडली असून यामध्ये ६ जणांचा समावेश असण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तरुणीला गुंगी येणारे पदार्थ खायला देऊन तिच्यावरती हा सामूहिक बलात्कार झाला आहे. ही तरुणी पिपराईच या गावी आपल्या मामाकडे चालली होती. तिला गुंगी येणार औषध हे चहातून दिले गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

रात्रभर पीडित तरुणी होती बेशुद्ध
बलात्कार झाल्यावर त्या तरुणीला नराधमांनी तिथेच सोडून दिले. संपूर्ण रात्र ती तरुणी बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून होती. सकाळी काही लोकांनी ही माहिती तिच्या वडिलांना दिली आणि मग वडिलांनी आपल्या मुलीला घरी आणले. घरी आणल्यानंतर सुद्धा ती तरुणी ३ ते ४ दिवस बेशुद्ध अवस्थेतच होती. नंतर पीडितेने आणि तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रेम प्रकरण असण्याची शक्यता
पीडितेचे आरोपींपैकी एका बरोबर प्रेम संबंध होते. प्रेम प्रकरणातूनच हा सामूहीक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ती स्थानकावर प्रियकराला भेटायला गेली असता, प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी चहातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

You might also like