जीव धोक्यात घालून कोब्रा हातात घेऊन मुलींनी केला ‘गरबा’, 12 वर्षाच्या मुलीसह 5 जण ताब्यात ( व्हिडिओ )

गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातमधील जुनागडमध्ये कोब्रा हातात पकडून मुलींनी गरबा खेळल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी घडली असून या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उपवनरक्षक सुनील बेरवाल यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आणि कोब्रा पुरवणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोब्रा देखील पकडला गेला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारीच्या आधारे गरबा संघटक निलेश जोशी, मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या झुमा जमाल सती यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आणि कोब्रा पकडणाऱ्या तिन्ही मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच आरोपींमध्ये 12 वर्षांच्या मुलीचा समावेश असून तिला बाल न्यायालयात हजर करण्यात आला .

Visit : Policenama.com 

You might also like