धुळे : पिस्तुल विकणारा तरुण अटकेत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. विकास रणजित राजपुत असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून 50 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबरीकडुन माहिती मिळाली की एक तरुण शहरात पिस्तुल विक्री करण्यासाठी येत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक तयार करुन अमळनेर नाक्यावर बंदोबस्तासाठी पाठविले असता विकास राजपुत हे एक पिस्तुल व एक गावठी कट्टा विक्री करण्यासाठी फागणे पारोळारोडने अमळनेर चौफुली कडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापाळा रचून विकास राजपुत याला ताब्यात घेतले.  त्याच्याजवळील 40 हजार रुपयांचे एक पिस्तुल व 10 हजार रुपयांचा एक गावठी कट्टा पोलीसांनी जप्त केला आहे.

ही कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले, पोलीस काॅन्स्टेबल रफिक पठाण, पो.ना.प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पाटील, राहुल सानप, उमेश पवार, मयुर पाटाल, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, विजय सोनवणे, तुषार परदेशी, किशोर पाटील, योगेश जगताप यांनी केली.

Visit : policenama.com