home page top 1

धुळे : मोरदड तांडा थांब्यावर रेल्वेगाडी खाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन –  तालुक्यातील मोरदडतांडा रेल्वे थांबावर सायंकाळच्या वेळी धक्कादायक घटना घडली. धुळ्याहून चाळीसगावकडे जाणाऱी रेलगाडी ही मोरदड थांब्यावर काही मिनिटे थांबली परत चाळीसगावकडे जाण्यास सुरवात केली असता कोणाला काही समजण्याच्या आतच तेथेच जवळ उभा असलेल्या एका तरुणाने धावत्या चाकाखाली स्वतःला झोकुन दिले.

यात तो तरुण जागीच दगावला. काही नागरीकांनी चेन खेचून रेल्वेगाडी थांबवली परंतू तो पर्यंत उशीर झाला होता.तो तरुण रक्तबंबाळ स्थितीत दोन रुळाच्या मध्ये मयत स्थितीत पडला होता. तरुणाने हे कृत्य का केले या बाबत परिसरात उलटसुलट चर्चा नागरीकांत सुरु होती. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

मृत तरुणांची ओळख पटवली तो तरुण शहरातील चित्तोडरोड परिसरातील शेलार वाडीत राहणारा आहे. त्याचे नाव प्रकाश पवार आहे. हि वार्ता शेलार वाडीत कळल्यानंतर सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like