…म्हणून 2 मुलींची आई अन् शिक्षिका असेलेल्या महिलेकडून तरूणाला ब्लॅकमेल, अखेर युवकानं केली आत्महत्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – एका विवाहित तरुणासोबत मैत्री करुन नंतर प्लॅट घेण्यासाठी त्याला ब्लॅकमेलिंग करत पैशाची मागणी एका महिला शिक्षिकेने केली. महिलेच्या सततच्या पैशाच्या मागणीला वैतागून आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील पहूरजिरा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय महिला शिक्षिकेला अटक केली आहे.

प्रभूदास शांताराम बोळे (रा. पहूरजिरा, ता. खामगाव) असे आत्महत्या Suicide केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शिक्षिका ही सुटाळा येथे आपल्या दोन मुलींसह राहते. ती खामगाव तालुक्यातील पहूरजिरा येथील शाळेत कार्यरत होती. त्यावेळी गावातील प्रभूदास बोळे या विवाहित तरुणाशी तिची ओळख झाली. यानंतर ती प्रभूदास याला व्हिडीओ कॉल, चॅटींग करत होती. तिने प्लॅट घेण्यासाठी त्याच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पैशाचा तगादा लावला होता. अखेर या प्रकाराला वैतागून त्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

प्रभूदासने आपली पत्नी वर्षा बोळे यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून आत्महत्येचे कारण सांगितले. यावरुन पत्नी वर्षा यांनी संबंधित शिक्षिकेच्या विरोधात जलंब पोलिसांत तक्रार दिली. प्राथमिक तपासात उपलब्ध पुराव्यावरुन संशयित आरोपी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करुन अटक केली. आरोपी महिलेला न्यायलयात हजर केले असता तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय