जळगाव : अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावमध्ये एका तरुणाने अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने खोटे नगर परिसरातील पंडीत क्वॉर्नर या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. संदीप धर्मराज निरखे (वय-37 रा. आव्हाणे ता. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.मात्र संदीप याने दारुच्या नशेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुत्रांच्या माहितीनुसार, संदीप हा फेब्रीकेशनचे काम करत होता. खोटे नगर परिसरातील पंडीत क्वॉर्नर या अपर्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर तो कुटुंबासह वास्तव्यास होता. मंगळवारी दुपारपासून तो तणावात होता. त्यामुळे त्याने मद्य प्राशन केले होते. घरी जातानाही तो मद्याच्या नशेत होता. रात्री आकराच्या सुमारास त्याने गॅलरीतून उडी मारली.
मुलीने थांबवण्याचा प्रयत्न केला.

गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मुलीने त्याला पाहिले. मुलीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला अपयश आले. गॅलरीतून खाली उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला. घरच्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.