Nagpur News : पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू, प्रेयसीला अटक

खापरखेडा (Nagpur ) : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे एका प्रेमीयुगलासाठी जीवघेणे ठरल्याची घटना घडली आहे. यामध्ये 27 वर्षीय तरुणाचा गळ्याभोवती दोरीचा फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दहेगाव रंगारी येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. जियाउद्दीन (वय 27 रा. टेकानाका, नागपूर (Nagpur) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जियाउद्दीन हा अभियंता असून तो बेरोजगार होता. 25 वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते. जियाउद्दीन व तरुणीचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी लग्नाची परवानगी नाकारल्याने दोघांनीही गेल्या वर्षी विवाह केला होता. ज्यामुळे दोघांनाही इतरत्र भटकंती करावी लागत होती. विशेष म्हणजे दोघांनाही मोबाईलवर सेक्स संबंधित पॉर्न क्लिप बघण्याचा मोठा छंद होता. मृत जियाउद्दीन तरुणीला घेऊन दहेगाव रंगारी येथे आला. परिसरातील एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली. त्यांनी मोबाईलवर अश्लील चित्रपट बघितला. यानंतर चित्रपटातील दृश्याप्रमाणे संभोग करण्याचे ठरविले. तरुणीने त्याचे हातपाय दोरीने बांधले. गळ्याभोवती दोरी आवळली. संभोग केल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली. दरम्यान, तो खुर्चीवरून पडला. त्यामुळे गळ्याभोवती फास आवळून त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने तरुणी बाथरूममधून बाहेर आली. जियाउद्दीनने काहीही प्रतिसाद न दिल्याने तिने आरडाओरड केली.

लॉज कर्मचाऱ्यांनी खोलीत धाव घेतली. जियाउद्दीन मृतावस्थेत दिसल्याने त्यांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला. तरुणीच्या माहितीवरून खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा पुढील तपास करीत होते.

तरुणाचा मृत्यू की हत्या?
मृत नग्न अवस्थेत होता. मृतकाचे हातपाय बांधलेले होते. गळ्याच्या भागालाही बांधले होते. अचानक तरुणी बाथरूममध्ये गेली. दरम्यान, मृतकाचा तोल जावून खुर्चीवरून पडला. त्याला बांधलेल्या रस्सीने गळ्याला फास लागला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हातपाय बांधून असणाऱ्या विचित्र घटनेत तरुणाचा मृत्यू की हत्या? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.