भर गर्दीच्या वेळी दांडेकर पुलावर गर्दूल्ल्यांकडून तरुणाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रतिकार केल्याने दोघांनी तरुणावर तीक्ष्ण हत्यार व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री दांडेकर पुलावर भर गर्दीच्या वेळी घडली. यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार दांडेकर पुलावर घडल्याने परिसरात मात्र खळबळ उडाली होती. हल्लेखोरांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संदिप लक्ष्मण घोडके (२६, शिक्रापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत दत्तवाडी पोलीस ठाण्यात सुरु होते.

दांडेकर पुल परिसरात सायंकाळी गर्दी असते. तर संदिर घोडके हे दांडेकर पुलाजवळील पेट्रोल पंपावर त्यावेळी दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी संदिपला लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला प्रतिकार केला. त्यामुळे त्यांनी संदिप यांच्यावर हल्ला केला. दगड व तीक्ष्ण हत्यारांनी त्यांच्यावर वार करण्यात आला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तर हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेतले. जखमी व हल्ला करणारे दोघेही व्हाईटनरच्या नशेत होते. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. तर दुसऱ्या हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत.