त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थीनीशी ‘अश्‍लील’ चाळे करणारा युवक ‘गोत्यात’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – त्रिशताब्दी एक्सप्रेसमध्ये एका विद्य़ार्थिनीशी अश्लील चाळे केल्याचा लाजिरवाणा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्रिशताब्दी एक्स्प्रेस सोमवारी नागपूरला जाताना तेव्हा प्रवासात सकाळच्यावेळी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या नातेवांईकांनी आरोपीला चोप दिला असून पोलीसांनी अटक करत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मधूर कासवा (२४) असं अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अश्लील चाळे करणारा व्यक्ती हा हिंगणघाट येथील रहीवासी आहे. तर पीडित विद्यार्थीनी ही नागपूरची राहणारी आहे. मधूर हा त्याच्या कुटुंबासह प्रवास करत होता. त्याच्या कुटुंबातील जवळपास ५० लोक त्याच्यासह प्रवास करत होते.  तर मुलगी एकटी प्रवास करत होती.

मुलगी ज्या कोचमध्ये प्रवास करत होती त्याच कोचमध्ये आरोपी प्रवास करत होता. त्याने सुरुवातीला तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्यास सुरुवात केली. मुलगी या प्रकाराला वैतागली होती. मात्र एकटी असल्याने काही बोलू शकली नाही. त्यामुळे आरोपीचे अधीकच फोफावले आणि तो पीडितेला अजून त्रास द्यायला लागला. त्यात त्याच्या कुटुंबाचे अधीक लोक गाडीस असल्याने त्याचे धाडसही वाढले होते.

मुलगी शांत बसली म्हणून त्याने रात्रभर तीला वाईट नजरेने पाहून आणि सकाळी ती झोपल्यावर आरोपीने मात्र हद्द करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही घटना सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान घडली. त्यानंतर मात्र मुलीने आवाज केला. त्यावर आजूबाजूच्या प्रवाशांनी गोंधळही घातला. परंतू आरोपीच्या कुटुंबातील अधीक लोक असल्याने हे प्रवासीही शांत झाले. मात्र त्यांनी रेल्वे पोलीसांना या प्रकाराची माहिती दिली होती. तसंच मुलीने तिच्या घरच्यांनाही या संदर्भात माहिती दिली होती.

त्रिशताब्दी एक्स्प्रेस नागपूरला पोहचण्यापूर्वीच मुलीचे नातेवाईक तेथे पोहचले होते. तेथे रेल्वे पोलीसांनी त्याला ताब्यात घेत त्याला पोलीस स्टेशनला नेले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसंच पोलीसांनी मधूर विरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलीस त्याला आमला येथे घेऊन गेले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त