‘झिरो’ पोलीस असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील दादा कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा भागात आज (सोमवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

फिरोज अनीस खान (वय-३२ रा. दादा कॉलनी, कैलासनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिरोज खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तो पोलिसांना टीप देत असल्याचा काहींना संशय होता. यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने फिरोजवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या फिरोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टोळक्याने फिरोजला दादा कॉलनी येथे एकट्याला गाठून त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like